पळसगांव येथे कर वसुली पथक दाखल थकीतकरदात्यांना कर भरण्याचे आव्हान
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
चिमूर तालुक्यातील पळसगांव येथे कर वसुली पथक २३फरवरी ला सकाळी ७ वाजेपासून दाखल झाले असून मालमत्ता कर व पाणीपट्टी कर नागरिकाकडून वसूल करण्यात आला.मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा वित्तीय वर्ष २०२० -२०२१ मधील थकीत असल्याने मार्च महिन्यात शंभर टक्के कराचा भरणा करणे आवश्यक आहे.मालमत्ता कर व पाणीपट्टी कर आजूनपावोतो नागरिकांनी भरणा न केल्याने संजय पुरी गटविकास अधिकारी व गुंतीवार विस्तार अधिकारी पंचायत समिती चिमूर यांनी वसुली पथक तयार करून थकीत असलेल्या करदात्यावर कर भरण्या करिता घरो घरी जाहुन नियमित कराचा भरणा करण्याचे आव्हान करीत आहे.
सद्या स्थितीत पळसगांव ग्राम पंचायत अंतर्गत उर्वरित कर वसुली लवकरच करण्यात येईल.असे पळसगांव ग्राम पंचायत चे सचिव अरुण उंधिरवाडे यांनी सांगितले.ग्राम पंचायतचा मालमत्ता चालू व थकीत पाणीपट्टी कर वेळेवर व नियमित भरण्याचे भरणा करावा असे सूचित करण्यात आले.सरिता गुरनुले सरपंच या वेळी उंधिरवाडे ग्राम सेवक,मानकर ग्रामसेवक,भक्तदास कोहचडे, सुधीर जुमडे ग्राम पंचायत कर्मचारी यांची उपस्थिती होते