ताज्या घडामोडी

नेरी तंमुस अध्यक्ष पदी सुरेश भाऊ कामडी यांची निवड

प्रतिनिधी: रामचंद्र कामडी

चिमुर तालुक्यातील नेरी ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा ही दि.७-९-२०२३ रोजी राष्ट्रसंत सभागृहात पार पडली
ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सौ.रेखाताई पिसे होत्या यावेळी ग्रामविकास अधिकारी एन जी धवने, उपसरपंच चंद्रभान कामडी,सर्व ग्रामपंचायत महिला सदस्य व पुरुष सदस्य उपस्थित होते

ग्रामसभेत गावातील अनेक विविध समस्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात येऊन
महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी ग्रामसभेतुन दोन नावे सुचविण्यात आली
हरिदास चांदेकर,व सुरेश कामडी यामध्ये हरिदास चांदेकर यांनी माघार घेत सुरेश कामडी यांना नेरी तंमुस अध्यक्ष पदासाठी मान दिला त्यामुळे सुरेश कामडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली

सुरेश भाऊ कामडी हे व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष,माजी ग्रामपंचायत सदस्य ,माजी तंमुस अध्यक्ष असा त्यांचा दांडगा अनुभव आहे
तत्कालीन तंमुस अध्यक्ष असताना तंमुस समितीच्या माध्यमातून अनेक प्रकरणाचा निपटारा करण्यात आला समिती सदस्यांची साथ मिळाली तेव्हा नेरी ग्रामपंचायतला शासनाकडून सात लाखांचा पुरस्कार मिळवून देण्यात तंमुस समिती यशस्वी ठरली होती हे त्यांचे फार मोठे योगदान आहे
या ग्रामसभेत पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
सुरेश कामडी यांची तंमुस अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close