ताज्या घडामोडी

आणि… इथे कुंपणच खातोय शेत

सरपंच पती हर्षल निब्रड चा प्रताप…

आंदोलन मागे घेण्यासाठी कंपनीकडे केली पैसे व कंत्राटाची मागणी.
बेरोजगार मात्र वाऱ्यावर…
वरोरा तालुक्यात खळबळ.

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुक्यात सालोरी येन्सा ब्लॉक मजरा (लहान) ग्रामपंचायत हद्दीत बीएस इस्पात कंपनी कार्यान्वयित आहे. मागील अनेक दिवसापासून कंपनी आणि कामगार यांचा वाद झाल्याने कंपनी बंद होती. परंतु मागील एक वर्षापासून कंपनी चालू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आणि गावातील बेरोजगारांच्या मनात रोजगार मिळेल अश्या आशा पल्लवित झाल्या. त्यांनी मिळेल तिकडे धाव घेऊन कंपनीत रोजगार मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही.अखेर निराश होऊन त्यांनी गावातील ग्रामपंचायती कडे धाव घेतली. ग्रामपंचायतीने एनओसी देताना घेतलेल्या लेखी करारनाम्यानुसार गावातील 60 टक्के लोकांना रोजगार देण्याचे कंपनीने मान्य केले. त्याचाच आधार घेऊन व लेबर कोर्टाच्या निर्णयानुसार जुने कामगारांना कंपनीत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे बेरोजगारांनी कंपनीला अनेकदा निवेदन तथा प्रत्यक्ष भेट घेऊन आपली समस्या मांडली परंतु कंपनीकडून मिळेल त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर ग्रामपंचायतीने सर्वानुमते गाव बंदीचा ठराव घेऊन बीएस इस्पात कंपनी विरुद्ध आंदोलन उभे केले. आंदोलनाचे नेतृत्व करण्याची जिम्मेदारी गावकऱ्यांनी युवा सेनेचे जिल्हा चिटणीस मनीष जेठाणी यांचेकडे स्वतः सोपविली. व त्यांच्या नेतृत्वात सदर कंपनीकडे रोजगार व इतर मागण्यांचे निवेदन सोपविण्यात आले. व त्या संदर्भात आंदोलन उभे करण्यात आले. मनिष जेठाणी यांनी कामगार प्रतिनिधी व ग्रामपंचायत कमिटी व गावकऱ्यांना सोबत घेऊन कंपनी व प्रशासनासोबत अनेकदा बैठकी घेतल्या. परंतु पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर 10 मे 2022 ला पुन्हा कंपनी विरोधात आंदोलन उभे करण्यात आले. त्यात यश येताना दिसताच राजकारण आडवे आले. मजरा (लहान) ग्रामपंचायतच्या संपूर्ण कारभाराची जिम्मेदारी असलेल्या महिला सरपंच यांचे पती हर्षल निब्रड हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. व ते स्वतःला अनेकदा सरपंच म्हणून समोरच्यांना आपली ओळख करून देत असतात. व ग्रामपंचायत चा संपूर्ण कारभार मी स्वतः पाहत असल्याचा भास निर्माण करतात. त्यामुळे अनेकदा प्रश्र्न निर्माण होतो की, ग्रामपंचायतीचा कारभार महिला सरपंच बघतोय की त्यांचे पती? हे एक कोडंच आहे. महिला सरपंच यांचे पती व विद्यमान सदस्य हर्षद निब्रड हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनीष जेठाणी हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेचे नेतृत्व मान्य नसल्याने आंदोलन फोडण्यासाठी अनेकदा त्यांनी प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी कंपनीचे एच आर यांना फोन वरून सदर आंदोलन रद्द करण्यासाठी व कंपनीचा त्रास थांबवण्यासाठी रोख रक्कम तसेच कंपनीत अनेक कंत्राटाची मागणी केली. व गावातील नागरिकांसोबत गद्दारी केली. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने त्यांचा भंडाफोड झाला. “शेतच कुंपण खात असल्याचा प्रकार घडला आहे”.ज्याच्या खांद्यावर गावाच्या विकासाची धुरा आहे तोच गावासोबत गद्दारी करत असेल तर नागरिकांनी न्याय मागावा तरी कुठे? गावातील नागरिक, बेरोजगार यांच्यात संभ्रम निर्माण झाले आहे. व सदर सरपंच पती विरोधात गावात तीव्र संताप व रोष निर्माण झालेला आहे. व गावातील नागरिकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता गावातील बेरोजगारांनी न्यायासाठी कोणाकडून अपेक्षा ठेवावी हा एक अनुत्तरित प्रश्न आहे? कंपनी प्रशासन व आंदोलनाच्या नेतृत्वानी एकमेका विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे. व पोलीस प्रशासन चौकशी करू खरं काय ते बाहेर आणतिलच ?पण आता प्रश्न हा आहे की स्थानिक गावातील बेरोजगारांना रोजगार न्याय मिळेल का? की त्यांना वाऱ्यावर सोडले जाईल. कुंपणच शेत खात असेल तर अपेक्षा ठेवायची तरी कोणाकडून? संविधानिक पदाचा गैरवापर करणाऱ्या सरपंच पती व विद्यमान सदस्य यांच्यावर काय कारवाई होणार? याकडे सर्व मजरा ग्रामवाशीयाचे व संपूर्ण वरोरा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया.
मी वरोरा शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती व शिवसेना पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे. त्यामुळे मी नेहमी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार जनतेला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. मी सतत जनतेला न्याय देण्यासाठी लोकहिताची वेगवेगळी आंदोलने करीत असतो. परंतु बीएस इस्पात कंपनी च्या विरोधात दिनांक 10-5-2022 रोजी स्थानिक गावकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन पुकारले होते. त्यामुळे हे आंदोलन अपयशी करण्याकरता जाणून-बुजून हेतू पुरस्कर माझी व माझ्या पक्षाची बदनामी करण्याच्या उद्देशाने माझ्यावर खोटे आरोप लावून वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. तसेच सदर प्रकरणात माझ्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा नसताना व गुन्हा दाखल झाला नसताना काही संबंधित वृत्तपत्र व मीडिया पोर्टल वर कंपनी अधिकाऱ्यांनी हितगुज करून माझ्या विरोधात माझी व पक्षाची बदनामी करण्याकरता खोट्या बातम्या प्रसारित केल्या आहेत. त्यामुळे माझे,माझ्या पक्षाचे ,माझ्या परिवाराचे मोठे अब्रू नुकसान झाले आहे करिता माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या कंपनी कंपनी अधिकारी व बातम्या प्रसारित करणाऱ्या पत्रकारावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे.
मनिष जेठाणी
शिवसेना वरोरा तालुका
संघटक

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close