हजरत सय्यद शाह तुराबुलहक रहे दर्गा उर्सा यात्रा 2025 ची पंधरा दिवस यात्रा सुरू राहू द्या नितीन जाधव गोगलगावकर
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने
गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी परभणी जिल्ह्यातील सर्व हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्मांच्या इतर समाजांच्या भाविकांच्या श्रद्धास्थान असलेले राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानले जाणारे हजरत सय्यद शाह तुराबुल हक रहे दर्गा यांचा 118 वा उर्साची यात्रा जत्रा साजरी होणार आहे पण जिल्हा प्रशासनाने यात्रा दरवर्षी पंधरा दिवस भरत असते 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत ही उर्साची यात्रा दरवर्षी भरल्या जाते पण प्रशासनाने यावर्षी दोन तारीख ते दहा तारखेपर्यंतच भरण्याचे आवाहन केले आहे म्हणून प्रशासनाने प्रतिवर्षीप्रमाणे पहिल्यासारखेच 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंतच उर्सा यात्रा महोत्सव जशाल तसा सुरू ठेवावा व साजरा करण्यास परमिशन देण्यात यावी कारण जे प्रत्येक दुकान जत्रेसाठी येत असतात प्रत्येक दुकानाचे भाडे खूप मोठे असते दुकानाचे भाडे निघाले पाहिजे त्याच्यातून आर्थिक भांडवल निर्माण झाले पाहिजे तसेच अख्या भारतातून महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून येथे तुरत पीर दर्गा बाबा मंदिर या ठिकाणी दर्शनाला येत असतात भाविक भक्त लांबून लांबून तर काही कामानिमित्त यायला थोडा वेळ लागत असतो काही काम असतात म्हणून जास्त दिवस असल्याने प्रत्येकाला या उर्सा यात्रेचा सहभाग घेता येईल जे संख्या कमी केलेली आहे दिवसाची ती संख्या वाढवण्यात यावी रात्री दहाच्या नंतर बंद करण्यात यावं दिवसभर चालू ठेवावे रात्री बंद करण्यात यावा दहा वाजता बाकी सर्व नेम खडक लावण्यात यावं व पोलीस प्रशासन जास्त प्रमाणात सुविधा देण्यासाठी संपर्क करावा किंवा होमगार्ड पोलीस कार सर्व अधिकारी या ठिकाणी जास्त प्रमाणात नियुक्त करण्यात यावा म्हणून कोणताही तंटा होणार नाही याची दक्षता प्रशासन आणि घ्यावं इतर सामाजिक संघटने नाही आव्हान करावं म्हणून राष्ट्र जन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर तसेच राष्ट्र जन फाउंडेशनचे महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्र सल्लागार डॉ गोविंद कामटे यांनी दोघांनी परभणी येथील दर्गा तुरतपूर बाबा मंदिरास दर्शन घेऊन परिसरामध्ये पाहणी केली व लोकांच्या भावना ऐकून घेतल्या म्हणून प्रशासनाला या दर्शनाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे म्हणून 2025 चा उर्सा महोत्सव हा पंधरा दिवस झालाच पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करा असे आव्हान राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष गोगलगावकर नितीन जाधव गोगलगावकर राष्ट्र जन फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार डॉ गोविंद कामटे यांच्या वतीने आव्हान करण्यात आला आहे अशी माहिती लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.