ताज्या घडामोडी

संभाजी ब्रिगेड परभणी च्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी:अहमद अन्सारी पाथरी परभणी

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद परभणी बाह्य यंत्रणेमार्फत करण्यात आलेले शिपाई, डाटा एन्ट्री ऑपरेटर व कंत्राटी अभियंता पद भरती ही मनमानी पद्धतीने झाल्यामुळे ती रद्द करण्यात येऊन त्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले
शासन निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या दिनांक 28/ 12/ 2022 नुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागा मध्ये बाह्य यंत्रणेमार्फत 8 डाटा एन्ट्री ऑपरेटर, 25 कंत्राटी अभियंता ,14शिपाई ही पद भरती करण्यात आली आहे. ही भरती करताना ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद परभणी जे उमेदवार भरण्यासाठी सीएससी गव्हर्नर्स सर्विसेस इंडिया लिमिटेड मुंबई कंपनीला सांगितले त्या सर्व उमेदवाराकडून शिपाई व डाटा एन्ट्री पदासाठी प्रत्येकी 50,000 हजार तर अभियंता पदासाठी एक लाख रुपये प्रत्येकी घेतले आहेत. ही भरती करताना आधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून सदरील कंपनी उमेदवारांची नावे कळविण्यात आली आहेत परंतु या निवड झालेल्या उमेदवारांची पडताळणी केली असता यामधील सर्व उमेदवार हे जिल्हा परिषद परभणी येथे सेवानिवृत्त अथवा कार्यरत असल्याचे कर्मचाऱ्यांची पाल्य किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक असल्याचे दिसून येते त्यामुळे ही भरती केवळ जिल्हा परिषद परभणी येथे कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठीच केल्याचे निदर्शनास येते यामध्ये जे अभियंता भरले गेले आहेत त्यांना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कोणते साधे अंदाजपत्रक तयार करता येत नाहीत त्यांना त्या पाणीपुरवठा विभागाचे पाण्याची टाकी इतर पाईपलाईन व कोणतेही ज्ञान नाही अशा उमेदवारांची निवड करण्याचे काम ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद परभणी यांनी केले तसेच डाटा एन्ट्री पदाची निवड करताना त्यांना संगणकावर टाईप येणे अतिशय आवश्यक आहे परंतु यातील बहुतांशी उमेदवाराला टायपिंग सुद्धा करता येत नाही आज रोजी परभणी जिल्ह्यामध्ये बेरोजगार तरुण शासनाच्या नोकरीसाठी दिवस रात्र एक करून प्रचंड मेहनत करून अभ्यास करीत आहेत परंतु या परभणीतील बेरोजगार तरुणांना या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या पद भरतीची कोणतीही कल्पना देखील नाही या पद भरतीची कोणतीही जाहिरात परभणीतील कोणत्याही वर्तमानपत्रात न देताच करण्यात आली आहे त्यामुळे भविष्यात परभणी जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांचा आक्रोश होण्याची शक्यता आहे यास जबाबदार पूर्ण ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद परभणी येथील संबंधित अधिकारी कर्मचारी हे कारणीभूत आहेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता व कर्मचारी अधिकारी यांनी त्यांच्या मर्जीतील उमेदवारांकडून लाखो रुपये घेऊन ही भरती केली आहे त्यामुळे ही भरती तात्काळ रद्द करून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून पात्र उमेदवारांची परीक्षा घेऊन नवीन भरती करण्यात यावी व ते उमेदवार सी एस सी ई गव्हर्नरस सर्विसेस इंडिया लिमिटेड मुंबई या कंपनीला अवगत करावे अन्यथा या विरोधात परभणीतील सर्व बेरोजगार तरुण तरुणीसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांच्या वतीने देण्यात आला.
निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे नितीन देशमुख ,भीम टायगर सेनेचे अर्जुन पंडित, विलास जोंधळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, स्वप्निल गरुड ,आरपीआय व्यापारी आघाडीचे राजाभाऊ येटेवाड, सिद्धार्थ उघडे, राजकुमार टाक ,विक्रम जयस्वाल, प्रसाद देवके या सर्वांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close