ताज्या घडामोडी

महर्षि वाल्मिकी ऋषींच्या जयघोषाने दुमदुमली काजळसर नगरी


काजळसर येथे श्री महर्षी वाल्मिकी ऋषी घटस्थापना दिन साजरा

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

नेरी वरून जवळ असलेल्या काजळसर येथे श्री महर्षी वाल्मिकी ढिवर समाज काजळसर अळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय श्री महर्षी वाल्मिकी ऋषी घटस्थापना दिन विकास मच्छि व्यवसायिक संस्था च्या प्रांगणात साजरा करण्यात आला.
काजळसर येथे महर्षी वाल्मिकी घटस्थापना दिन साजरा करण्याचे हे चवथे वर्ष असून मोट्या उत्सहात याही वर्षी आयोजन करण्यात आले होते दि 17 फ्रेब्रु ला सकाळी ग्रामसफाई करून सकाळी 8 वाजता ह भ प मुखरू मारबते महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली दुपारी महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाला गावातील अनेक महिलांनी भाग घेतला त्यानंतर 2 वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली सायंकाळी भजन संध्या चे आयोजन करण्यात आले होते यात संगीत महिला भजन मंडळ नांदगाव श्री वाल्मीकी गुरुदेव मुलीचे भजन मंडळ किनंही मुरमाडी गुरुदेव भजन मंडळ बोथली महिला वारकरी भजन मंडळ टेकेपार जय वाल्मिकी भजन मंडळ खंडाळा वारकरी भजन मंडळ अडेगाव टेकरी काजळसर बेलदेव भजन मंडळ नवतला यांनी भाग घेतला होता तसेच महर्षी वाल्मिकी ऋषीची कुटी तयार करून परिसरातील लोकांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू तयार केले होते यात महर्षी वाल्मिकी यांचे प्रतिमा ठेवलेली होती.
दि 18 फेब्रुवारी ला सकाळी गावस्वच्छता करून गावातील महिलांनी घरासमोर सडा शिंपण करून रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या यानंतर ढोल ताश्याच्या निनादात वाजत गाजत अनेक गावातील भजन मंडळाच्या सहकार्याने वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील सर्व नागरिकांनी भाग घेतला होता महिलांनी रंगीत साडीचोळी घालून आकर्षक वेषभूषा साकारली होती तर पुरुषांनी सुद्धा पेहराव केला होता बाळ गोपाळ यांनी एक रंग एक गणवेश परिधान केला होता महर्षी वाल्मिकी ऋषींच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून उठला होता यानंतर दुपारी मार्गदर्शनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले यात मान्यवर अध्यक्ष म्हणून सौ मंगला गिरीधर हटवादे माजी सभापती प स सिंदेवाही तर मार्गदर्शक म्हणून डॉ प्रकाश नान्हे सर एकलव्य सेना विदर्भ प्रदेश अध्यक्ष उपस्थित होते प्रमुख अतिथी आणि प्रमुख पाहुणे म्हणून अडेगाव काजळसर येथील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना नान्हे सरांनी सांगितले की समाजाची प्रगती झाली पाहिजे सुशिक्षित नवतरुण पुढे आले पाहिजे वाल्मिकी ऋषींच्या कार्यावर प्रकाश टाकला तसेच हटवादे ताईंनी समाज प्रबोधनावर मार्गदर्शन केले यानंतर गोपाळकाला करून महाप्रसाद चा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाल्मीक ऋषी समिती आणि विकास मच्छि सह सोसायटी च्या श्रीकृष्ण सामुसाकडे काशिनाथ ठाकरे संभाजी सामुसाकडे संजय नागपुरे हिरामण गेडाम प्रकाश मेश्राम आदी सह सर्व सभासद कार्यकर्ते बाळ गोपाळ आबालवृद्ध गांवकरी यांनी परिश्रम घेतले तसेच सायंकाळी लहान मुलां मुलीचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close