ताज्या घडामोडी

रखडलेल्या शिष्यवृत्त्या खात्यात त्वरित जमा करा : नुमान चाऊस

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींसाठी चाऊस घेणार शिक्षण मंत्री यांची भेट

महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना भेटणाऱ्या शिष्यवृत्ती हे त्यांच्या खात्यात जमा झालेल्या नाहीत. शालेय शिष्यवृत्ती, तांत्रिक शिक्षण शिष्यवृत्ती, फार्मसीत शिकणाऱ्या मुलं/मुली तसेच इतर अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तींचे फॉर्म भरलेले आणि पात्र असलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या खिशातून कॉलेजची फीस जमा करावी लागत आहे. तसेच वेळेत फीस न भेटत असल्यामुळे काॅलेजेसना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांची भेट घेऊन संसदेत बेगम हजरत महाल शिष्यवृत्ती बाबत आवाज उठवण्यासाठी निवेदन केले असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी मागणी केली आहे की ज्या शिष्यवृत्ती अजून खात्यात जमा झालेले नाहीत त्या तात्काळ विद्यार्थ्यांचा खात्यात जमा करण्यात याव्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close