शिवसेना नागभीड तर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार तसेच मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न
तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड
दिनांक 23जानेवारी 2022 ला आझाद हिंद सेनेचे संस्थापक सन्मा. नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच हिंदू हृदय सम्राट सन्मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त, चिखल परसोडी प्रभाग क्र.2 नागभीड येथे मनोज लडके शिवसेना उप-तालुका प्रमुख यांचे नेतृत्वात आणि आस्था हॉस्पिटल ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने, मोफत आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आला सदर शिबिरात डॉ. पंकज लडके जनरल फिजिशियन तसेच डॉ. सुशील चुर्हे वात विकार, संधीविकार तज्ञ यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केला होता, सदर शिबिरात 460 रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला.
त्याचप्रमाणे शिवसेना कार्यालय नागभीड येथे मोफत रक्तगट तपासणी शिबीर डॉ. राजेश शनिवारे आणि शिवसेना नागभीड यांचे मार्फत घेण्यात आला, या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा. मेंढे साहेब, पोलीस निरीक्षक नागभीड, अध्यक्ष म्हणून मा. पंजाबराव गावंडे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी चंद्रपूर व माजी जि. प. सदस्य, अमृत भाऊ नखाते उप-जिल्हा प्रमुख शिवसेना, भोजराजभाऊ ज्ञानबोनवार तालुका प्रमुख, श्रीकांत पिसे शहर प्रमुख, मनोज लडके उप-तालुका प्रमुख, बंडू पांडव उप-तालुका प्रमुख, गिरीश नवघडे, विभाग प्रमुख, पुष्पदेव ब्राम्हणकर विभाग प्रमुख, प्रमोद राऊत उप-विभाग प्रमुख, नंदू खापर्डे व राजेश तेजेकर उप-शहर प्रमुख, सरोजताई खापरे शहर प्रमुख महिला आघाडी, किर्तीताई गेडाम उप महिला तालुका प्रमख, गायत्रीताई दडमल उप-विभाग प्रमुख महिला, प्रशिल निमगडे, नाझीम शेख युवासेना समन्वयक, अजित गोडे युवासेना तालुका प्रमुख, नाना अमृतकर, अजय पाथोडे, अनिल गुरपुडे, व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरात 460 रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला तसेच मोफत रक्तगट तपासणी शिबिरात 100 चे वर रक्तगट तपासणी करण्यात आली.