ताज्या घडामोडी

मलकापूर येथे कै.फुलचंद गित्ते यांच्या वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमनिमित्त ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांचे किर्तन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

तालुक्यातील मौजे मलकापूर येथे कै.फुलचंद कोंडिबा गित्ते (एम. कॉम,बीएड) यांचा वर्षश्राध्दाचा कार्यक्रमानिमित्त शुक्रवार दि.२९ मार्च २०२४ रोजी ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून भाविक भक्तांनी या किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


परळी तालुक्यातील मलकापूर येथील महादेव फुलचंद गित्ते (पत्रकार) ,केशव फुलचंद गित्ते, वैभव फुलचंद गित्ते यांचे वडील कै.फुलचंद कोंडिबा गित्ते (एम.कॉम,बीएड) यांचा वर्षश्राध्दाचा कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. कष्टाने केली आयुष्याची सुरुवात। सगळयावर फिरवला मायेचा हात । सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ । जन्मो जन्मी पाहु आम्ही तुमची वाट ।। मित्ती माघ फाल्गुन कृ.४ शके १९४५, शुक्रवार, दि.२९/०३/२०२४ रोजी वारकरी भुषण तथा जगप्रसिद्ध कीर्तनकार श्री.ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर शास्त्री, श्री क्षेत्र आळंदी यांचे दुपारी १ ते ३ कीर्तन होणार आहे. तसेच पखवाज सेवक गंभीर महाराज अवचार श्री क्षेत्र आळंदी, गायणाचार्य ह.भ.प.शंकर महाराज इंगवले, गायणाचार्य ह.भ.प.गणेश महाराज सावळे, गायणाचार्य ह.भ.प. भगवान महाराज ईसादकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील महाराज, गायक, भजनी मंडळी, वादक उपस्थित राहणार आहे. दुपारी ३ ते आपल्या आगमनापर्यंत भोजनाचा कार्यक्रम होणार आहे.
परळी तालुक्यातील मलकापूर येथील प्रगतशील शेतकरी कै.फुलचंद कोंडिबा गित्ते हे मितभाषी, अत्यंत हुशार, प्रेमळ स्वभाव,अडचणीच्या वेळेत सदैव मदतीचा हात पुढे करणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे व्यक्तीमत्व होते. ते सर्वत्र आबा या नावाने परिचित होते. त्यांनी आपल्या वागण्यातून मोठेपणा अथवा अधिकार कधी गाजवला नाही. साधी राहणी, शांत स्वभाव, संयमी वृत्ती यामुळे ते सर्वांना जवळचे वाटायचे. शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. या बरोबरच शेतीनिष्ठ शेतकरी म्हणुन ते परिचित होते. तसेच सामाजिक, शैक्षणिक, कृषी, धार्मिक क्षेत्रासह अन्य कार्यात अग्रेसर म्हणून परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यात सुपरिचित असणारे व्यक्तीमत्व म्हणून कै.फुलचंद कोंडिबा गित्ते यांचे ओळख होती.
परळीसह पंचक्रोशीतील नागरिक, मित्र परिवार, ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविक भक्तांनी वारकरी भुषण श्री.ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर शास्त्री, श्री क्षेत्र आळंदी यांचे किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी मलकापूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन मधुकर कोंडिबा गित्ते, महादेव फुलचंद गित्ते, केशव फुलचंद गित्ते, वैभव फुलचंद गित्ते, शाम मधुकर गित्ते, माऊली मधुकर गित्ते व गित्ते परिवार यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close