युवकांचे प्रेरणास्थान- स्वप्नस्पुर्ती प्रोडक्शन– उज्वला निमगडे
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
संगित कोणतेही असो, एकदा कानावर पडलं कि ते ऐकतच राहावयासे वाटते! मग काम कितीही असो ! प्रत्येकाला या संगीताचा मोह असतोच ! संगीत कोणत्याही चित्रपटाचे असो कि मग कोणत्याही अल्बमचे असो, याच प्रकारच्या अल्बम प्रोडक्शनची निर्मिती आपल्या परिसरात होणे, म्हणजे एक पाहिलेलं स्वप्नच होय, हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका प्रोडक्शननी पुढाकार घेतला अर्थात त्या प्रोडक्शन नांव म्हणजे स्वप्नस्पुर्ती प्रोडक्शन! चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील सावलीच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात स्वप्नस्पूर्ती प्रोडक्शन प्रस्तुतचे, ” जाऊ नको “या गाण्याचे शूट नुकतेच करण्यात आले होते, वरील गाण्याचे दिग्दर्शक वैभव बांबोळे ,निर्माता अतुल कोठारे, तर प्रोडक्शन मॅनेजर गणेश गेडाम हे आहेत.
संगीत दिग्दर्शक निखिल गटलेवार, प्रबुद्ध वारके, सौरभ चुनारकर, सिनेमॅटोग्राफर वैभव तुमापल्लिवार असून व्हिडिओ एडिटर शर्वरी यामावर यांनी केलेले आहे.
सदरहु प्रोडक्शननी गडचिरोलीतील पोरेड्डीवार कॉम्प्लेक्स मध्ये एक भव्य प्रोग्राम घेऊन आपल्या जाऊ नको या गाण्याचे एका मोठ्या स्किनवर प्रदर्शन केले होते.
या गाण्यात प्रामुख्याने अदीप दरडे, नंदिनी ठाकरे , प्रतिक वाढई, गणेश कुमरे, गुरूदास भोयर, अतुल कोठारे, अमर सातघरे, मंगेश गेडाम,भाऊराव कोठारे, राकेश कन्नाके इर्शान पठाण,डॉ.पवन कवठे, प्रिया कोठारे, रक्षिता बांबोळे, प्रीती पोहणकर, रश्मी वाळके,यांचा समावेश आहे.गायक /लिरिक्स :- आकाश डिकोंडवार गायिका :- आर्या आखाडे , पब्लिसिटी डिसाईन:- विक्रांत भरडकर, कोरिओग्राफर :- आकाश नैताम, अदीप दरडे मेकअप आर्टिस्ट :- उज्वला यामावार, मार्गदर्शक :- विजय नरचूलवार, भाऊराव कोठारे, डॉ. पावन कवठे,मंगेश गेडाम संकल्पना :- VGA त्रिमूर्ती, या गाण्याचे शूटसाठी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातिल प्राचार्य खोब्रागडे यांनी सहकार्य केले होते. गाण्यासाठी सावली येथील गाव वासियांनी तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयातिल कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. हे गाणं स्वप्नस्पूर्ती प्रोडक्शन या युट्युब चैनेल वर प्रदर्शित झालेले आहे,गाण्याला संगीत प्रेमीचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या गाण्यासाठी शुभम मेश्राम अभय तुमपल्लीवार करण कांबळे, ओम मारभते , सुचित सिडाम , दीपक पोहनकर, सागर गेडाम यांनी प्रोडक्शन टीम म्हणून काम केले आहे.
पाहिल्यांदाच या परिसरात प्रोडक्शननी प्रेमात मी तुझ्या या गाण्याची शूटिंग केली होती, त्या गाण्याच्या भरघोस यशानंतर जाऊ नको हे गाण ते घेऊन आलेले आहेत, सावली तालुक्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे.