खेर्डा महादेव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज गुरु अनुग्रह दिनानिमित्त मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 06 फेब्रुवारी 2022 ते 13 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान खेर्डा महादेव येथे प्रसिद्ध भारुडकर श्री ह भ प त्रिंबक महाराज आम्ले यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची आज दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी श्री ह भ प बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी श्रीमद् भागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व पंचमवेद गाथा पारायणाची सांगता झाल्यानंतर तीनही ग्रंथाचे विधिवत पूजन करण्यात आले. ग्रंथराज ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा या ग्रंथांचे पूजेचे यजमान श्री संतोष आम्ले होते तसेच श्रीमद् भागवत कथेची समाप्ती झाल्यानंतर श्री प्रताप आमले यांच्या हस्ते श्रीमद् भागवत ग्रंथाचे सपत्नीक पूजन करण्यात आले.
दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी श्री ह भ प बाळू महाराज गिरगावकर यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर दहीहंडीचा प्रोग्राम झाला. त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक श्री त्रिंबक महाराज आमले यांच्या वतीने महाप्रसाद झाला. सदर कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
सदर कार्यक्रमात पुढील प्रमाणे नामांकित महाराजांची कीर्तने झाली.
प्रथम किर्तन पुष्प श्री ह भ प अशोक महाराज पुरी यांनी गुंफले, तसेच श्री ह भ प पंकज महाराज थोरे, श्री पांडुरंग महाराज उगले, श्री ह भ प सचिन महाराज लावणीकर, श्री ह भ प चांगदेव महाराज कंडारीकर, श्री सारंगधर महाराज रोडगे, श्री ह भ प सिताराम महाराज रोडगे यांची कीर्तने झाली.
सदर कार्यक्रमास परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
श्री नारायणराव आम्ले, बाबासाहेब आम्ले व त्रिंबक आमले यांच्या वतीने सर्व गुणी जणांचे व सर्व उपस्थित भाविकांचे आभार व्यक्त करण्यात आले.
अशी माहिती कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री दीपक आम्ले यांनी दिली.