ताज्या घडामोडी

आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने फळ वाटप

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

आजादी का अमृत महोत्सव या सोहळ्या अंतर्गत आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा ,कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, उन्नत भारत अभियान , रेड रिबन क्लब वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 ऑगस्ट 22 ते 17 ऑगस्ट 22 असे पाच दिवस फळे वाटप उपक्रम राबविण्यात आला.
ज्यात महाविद्यालयातर्फे वरोरा तालुक्यातील मालविय अंगणवाडी केंद्र विभाग-१ व विभाग-२ वरोरा, अंगणवाडी केंद्र इंदिरा नगर ,अंगणवाडी केंद्र द्वारका नगरी विभाग-१, मुक्तांगण पूर्व माध्यमिक केंद्र (पाळणाघर ) आनंदवन ,वरोरा येथील जवळपास 165 बालगोपालांना फळे वाटप करण्यात आली .ज्यात बालकांना केळी व सफरचंद चे वितरण करण्यात आले.
सदर फळ वाटप करण्याचा उपक्रम हा कार्यक्रम समन्वयक डॉ रंजना लाड, डॉ. अविनाश पंधरे,एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ.नरेंद्र पाटील,राठोड सर व एन सी सी आफीसर लेफ्टनंट लता आत्राम, महा गर्ल्स बटालियन एन सी सी नागपूर , सर्व प्राध्यापक मंडळी, एन एस एस स्वयंसेवक व एन सी सी कॅसेट्स यांच्या सहकार्यातून संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य राधा सवाने , जेष्ठ प्राध्यापिका डॉ. रंजना लाड समाजशास्त्र विभाग, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साप्ताहिक कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.रंजना लाड, डॉ.अविनाश पंधरे इंग्रजी विभाग , लेफ्टनंट लता आत्राम ए .एन .ओ 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी नागपुर यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close