उमा नदीवरील डम्पिंग उठले जनतेच्या जिवावर
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
डम्पिंग हटविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन
भारत सरकार नदी स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. परंतु चिमुर नगरपरिषदेनेच नदि स्वच्छते चे धिंडवडे उडविले जात आहे. चिमुर क्रांती भुमीला उमा नदी लागुन आहे. याच नदीच्या पात्रात डंम्पींग लावण्यात आले. त्यामुळे उमा नदीचे पात्र प्रदुषित झाले आहे. तेच पाणी चिमुर क्रांती भूमीतील नागरिकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धन समिती चिमुर कडुन सतत तिन वर्षापासुन नगरपरिषद चिमुर, जिल्हाधिकारी चंद्रपुर, प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपुर, यांचे कडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला परंतु उपयोग झाला नाही. नगरपरिषद कडुन चिमुर- जांभुळघाट मार्गावर डंम्पींग यार्ड साठी जागा घेण्यात आली. या जागेवर डंम्पींग यार्ड सुद्धा तयार करण्यात आले पण अजूनपर्यंत डम्पिंग यार्ड स्थलांतर करण्यात आले नाही.चिमुर वासियांना किती वर्ष प्रतिक्षा करावी लागणार ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. अनेक पर्यटकांना चिमुर– कोलारा मार्गावरुन नाक दाबुन जावे लागते. याच मार्गावरुन सेलिब्रेटी, प्रसिद्ध खेळाडू, कलाकार वाघाची झलक पाहण्यासाठी जात असतात. याच डम्पिंग वर जनावरे, डुकरे यांनी आपले खाद्य बनविले आहे. त्यामुळे जनता, जनावरे यांचे प्राण पणाला लागले आहेत. नगरपरिषद ने त्वरीत डंम्पींग यार्ड स्थलांतर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी वनमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपुर, यांना निवेदन देण्यात आले
यावेळी पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष कवडू लोहकरे, मोहन सातपैसे, सुदर्शन बावने , विशाल बारस्कर, बुच्चे आदी पर्यावरण संवर्धन समिती सदस्य उपस्थित होते.
कवडू लोहकरे यांचे मत
“” उमा नदीच्या पुरात अनेकदा डंम्पींग वाहुन गेले आहे. प्लास्टिक, जनावराचे मांस, कोंबड्याचे पिसे, आदी कच-याने जनता हैरान झाली आहे. तात्काळ दखल न घेतल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल. “”
कवडू लोहकरे
अध्यक्ष पर्यावरण संवर्धन समिती चिमुर