चिमूर जि.प प्रा.शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्थेत सुयोग पॅनेल विजयी

ढोल ताश्यांच्या गजरात निघाली मिरवणूक .
प्रतिनिधिःरामचंद्र कामडी
चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर येथील जि. प. प्रा. शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत पुरोगामी शिक्षक समिती,कास्टट्राईब कल्याण महासंघ आणि शिक्षक भारती यांच्या सुयोग पॅनेलने दणदणीत विजय संपादन केलेला आहे.एकूण १३ पैकी तेराही जागा या पॅनेलने एकतर्फी जिंकल्या असल्याचे वृत्त आहे.
पार पडलेल्या निवडणुकीत विमुक्त भटक्या गटातून जनार्दन केदार,अनुसूचित जाती/जमाती गटातून विनोद गेडाम,इतर मागासवर्ग गटातून संदीप मेंढुले,महिला राखीव गटातून कविता जोगी, मनीषा आष्टनकर,सर्वसाधारण गटातून सरोज चौधरी,विशाल वासाडे,रमेश मिलमिले,बाळू नंदनवार ,सलीम तुर्के,सुनिल कोयचाडे,ताराचंद रामटेके,गोवर्धन ढोक यांनी विजय संपादन केला आहे.निकाल लागल्या नंतर
विजयी उमेदवारांची ढोल ताशांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्या नंतर प्रचार कार्यालयात विजयी सभा घेण्यात आली.सभेचे अध्यक्षस्थान ना. रा. कांबळे यांनी विभुषित केले होते.यावेळी पुरोगामी शिक्षक संघटनेचे नरेंद्र मुंगले,विनोद हटवार,ताराचंद दडमल,ब्रम्हानंद माळवे,गोविंद गोहणे,कास्टट्राईब कल्याण महासंघाचे किशोर नागदेवते,यशवंत सूर्यवंशी,शिक्षक भारतीचे सुरेश डांगे, रावण शेरकुरे, कैलास बोरकर, महिला पदाधिकारी माधुरी काळे,कल्पना महाकरकार,गीता ठाकरे, वंदना हटवार आदीं उपस्थित होते.संस्थेच्या सर्व सदस्यांसाठी सुयोग पॅनेल काम करेल. संस्थेची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी नवनियुक्त संचालक मंडळ कटिबद्ध राहील,संस्थेचा वटवृक्ष अधिक बहरेल यासाठी सर्वांनी निरपेक्ष भावनेने काम करावे असा आशावाद याप्रसंगी सुयोग पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.नवनिर्वाचित संचालकांना पेढे भरवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.सभेचे संचालन रवींद्र वरखेडे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार सुनिल मसराम यांनी मानले.