शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे वैद्यकीय प्रवेश पात्रता (NEET) परीक्षा, तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित, शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी ता. पाथरी जि. परभणी येथे दिनांक 5 जून 2024 रोजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) मध्ये उत्कृष्ट गुण घेणारे माजी विद्यार्थी तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी चे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरीचे सभापती अनिलभाऊ नखाते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंद धनले, खेडूळा येथील उपसरपंच दत्ताराव वऱ्हाडे पालक प्रतिनिधी मा. तुकाराम वाघ, प्राचार्य गणेश पितळे, प्राचार्य डहाळे के. एन. मुख्याध्यापक यादव एन.ई. उपमुख्याध्यापक गुंडेकर आर. जे. जाधव एन. एस. आदी उपस्थित होते. नीट परीक्षेत उत्कृष्ट गुण घेणारे विद्यार्थी चि.स्वराज्य नवनाथ यादव (632 गुण), कु. प्राजक्ता अशोक क्षीरसागर ( 625 गुण), चि. अक्षद मुंजाजी मोगरे(603 गुण) चि. मयूर भागवतराव डुकरे (589 गुण) कु.रसिका भास्करराव प्रधान (584 गुण) चि.यश कैलासराव कसबकर(540गुण) या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यालयातून बारावी बोर्ड परीक्षेत 260 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 255 विद्यार्थी उत्तीर्ण झाले,119 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे, उच्च माध्यमिक विद्यालयाचा 98.07% निकाल लागला आहे तर माध्यमिक विद्यालयातून 208 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 200 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, 82 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत, दहावीचा 96.15% एवढा निकाल लागला आहे.
याही वर्षी विद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. उपस्थित प्रमुख पाहुणे आनंद धनले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलभाऊ नखाते यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डहाळे के एन. तर सूत्रसंचालन टी. एस. शेळके व प्रा. एस.डी. चव्हाण यांनी केले. या प्रसंगी कु.अंजली लिपणे व कु.धनश्री चौरे या गुणवंतांनी तसेच पालक प्रतिनिधी तुकाराम वाघ, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. बालासाहेब गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्य केले.
शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी गुणवंत विद्यार्थी व पालक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.