लोणीकरांचा दणका – जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर तात्काळ पंचनाम्यांना सुरुवात
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लोणीकरांनी पत्राद्वारे केली पिकांच्या नुकसान भरपाईची मागणी
लोणीकरांच्या सुचनेनंतर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या तहसीलदारांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासनाच्या वतीने मात्र अतिवृष्टी नाही या विचाराने कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्याचे टाळले होते परंतु मागील 20 ते 22 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याकारणाने मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे 50% पेक्षा अधिक नुकसान झाले आहे काल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांना फोनवरून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून लोणीकरांच्या सूचनेनंतर तात्काळ पंचनाम्याना सुरुवात झाली आहे .
प्रत्यक्षात अतिवृष्टी झालेली नसेल तरीदेखील शेतकऱ्यांचे 33% पेक्षा अधिक नुकसान झाले असेल तर प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पंचनामे करण्याची तरतूद कायद्यानुसार आहे ही बाब लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचवल्यानंतर प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे मागील 20 ते 22 दिवसापासून सतत मराठवाडा सह जालना जिल्ह्यात पाऊस सुरू असून अतिवृष्टी नसली तरी देखील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहेत त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्राद्वारे लेखी मागणी केली आहे.
परतुर विधानसभा मतदार संघातील मंठा तालुक्यात सरासरी 602 मिलिमीटर पाऊस पडला असून तालुक्यातील चार मंडळांपैकी मंठा 537 मिलिमीटर तळणी 608 मिलिमीटर डोसा 510 मिलिमीटर तर पांगरी गोसाई मंडळात 747 मिलीमीटर सरासरी पाऊस पडल्याची नोंद आहे. परतुर तालुक्यात 535 मिलिमीटर पडला असून त्यातील परतूर मंडळात 194 मिलिमीटर वाटूर मंडळात 175 मिलिमीटर आष्टी मंडळात 78 मिलिमीटर सृष्टी मंडळात 99 किलोमीटर तर सातोना मंडळात 95 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे जालना तालुक्यात सरासरी 585 मिलिमीटर पाऊस पडला असून परतूर विधानसभा मतदारसंघातील नीर मंडळात 507 तर सेवली मंडळात 552 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे अतिवृष्टी झालेली नसली तरी देखील मागील 20 ते 22 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याकारणाने अनेक शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहेत त्या संदर्भातील नुकसान भरपाई साठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे
लोणीकरांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स
अतिवृष्टी किंवा सततच्या पावसामुळे किंवा कोणत्याही कारणाने 33% पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असेल तर त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत अशी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे महसूल प्रशासनाची तात्काळ बैठक घेऊन तहसीलदारांसह इतर अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या तत्पूर्वी मात्र अतिवृष्टी झालेली नाही असे गृहीत धरून पंचनामे करण्याची गरज नाही असाच समज प्रशासनाचा होता.