ताज्या घडामोडी

जुलैचा पंधरवाडा संपला तरी वाघाळा आणि पंचक्रोशीत पेरणी नाही

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी.

संपुर्ण जुन महिणा कोरडा गेला जुन च्या शेवटी तीन दिवसात पाऊस पाथरी तालुक्यात लहरी पणे पडला. त्यावर काही भागात पेरणी उरकली जुलैत काही भागात पुन्हा पावसाच्या सरी बरसल्या परंतु तालक्याच्या दक्षिण भागातील वाघाळा आणि पंचक्रोशीत अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्याने खरीप अडचनित आल्याने शेतकरी वर्ग हताश असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

या वर्षी मान्सून ने काहिसा उशिर करत आगमन केले खरे मात्र वेळे आधिच जुन महिण्यात संपुर्ण देश व्यापला अनेक ठिकाणी ढग फुटी सारखा पाऊस बरसतोय. मात्र काही ठिकाणे अद्यापही कोरडीच असल्याचे सांगितले जात आहे. असाच काहिसा प्रकार पाथरी तालुक्यातील शेतकरी वर्ग अनुभवतोय. पाथरी मंडळातील वाघाळा गावात जुलै महिणा अर्धा संपला तरी अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्याने खरीपातील सोयाबीन,कापुस,तुर,मुग, उडीदा सह अन्य सर्वंच पेरण्या रखडल्या आहे. वाघाळा गावा सोबतच बाभळगाव मंडळातील तारुगव्हाण,डाकुपिंप्री,लिंबा,बनई,फुलारवाडी,विटा,मुदगल ही गावे अद्यापही कोरडीच आहेत.

खरीपाच्या पेरणीची शेवटची तारीख १५ जुलै सांगितली जाते मात्र अद्याप ही पाच सहा इंच ओल जाईल असा पाऊस या भागात झालेला नसल्याने पेरणीची कामे थांबलेली आहेत.शेतक-यांनी मोठा खर्च करून बियाणे,खते,तननाशक औषधांची खरेदी करून ठेवली आहे. यात पाऊस पडेल या अशेवर काहिंनी पेरणी उरकली मात्र ही संपुर्ण पेरणी वाया गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. ज्यांच्या कडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतक-यांनी काही प्रमाणात कापिस पिकाची लागवड केली. मात्र पावसा अभावी इतर पेरण्या रखडल्या आहेत. शेतशिवारात उदासिनता दिसुन येत आहे. तर पावसा अभावी ऊसाचे उत्पादन ही घटणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मागिल आठ दिवसात वरिल सर्व गावांच्या आसपास पाऊस पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत परंतु वाघाळा,चाटे पिंपळगावचे अर्धे शिवार त्या सोबतच वंजारवाडी,मुदगल,विटा,लिंबा,फुलारवाडी,बनई,डाकुपिंप्री आणि तारुगव्हाण या गावच्या अनेक शेतक-यांनी कमी पाण्यावर लागवड केलेला कापुस आणि सोयाबीन,मुगाची पेरणी आता दुबार करावी लागणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. गुरूवारी सायंकाळी तालुक्यात चांगला पाऊस झाला मात्र वरिल सर्व गावे कोरडीच राहिली. या वर्षी मोठा मोबदला देत शेत ठोक्याने करणारे अशा परिस्थितीने चांगलेच अडचनीत आले असुन १५ जुलै नंतर पाऊस पडला तर या पाण्यावर केलेल्या पेरणीला अपेक्षित उतारा मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. एकुनच वरील सर्व गावे सद्यस्थितीत दुष्काळी परिस्थितीचा अनुभव घेत असल्याचे शेतकरी वर्ग सांगत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close