ताज्या घडामोडी

कर्मयोगी गाडगेबाबा खरे सर्जनशिल वैज्ञानिक ज्ञानी संत- रामचंद्र सालेकर, मुख्याध्यापक जि. प. उ. प्राथ.शाळा वाघनख

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

आज दि.२३ फेब्रुवारी २०२२ ला जि.प. चंद्रपूर पं सं वरोरा अंतर्गत जि.प.उच्च प्राथ.शाळा वाघनख येथे मा.दिपक भालशंकर सरपंच वाघनख यांचे अध्यक्षतेखाली कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी गाडगेबाबाच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकतांना गाडगे महाराजांनी आपल्या प्रबोधनातून शिक्षण हेच मानसाच्या प्रगतीचे द्वार असून या द्वारात प्रवेश करावाच लागेल हे साधे सरळ सोपी उदाहरणे देवून ‘जेवणाचं ताट मोडा पण मुलांना शिकवा’ असे सांगत,अंधश्रद्धेवर प्रहार करतांना देव कुणी पाहिला नाही,देव कुणाला दिसला नाही,देव कुणाला दिसणार नाही असे सांगून दगडात देव नसून दगडाची सेवा करण्यापेक्षा दीन दुःखीत मुक्या प्राण्याची सेवा करा त्यातचं देव वास करतो असे सांगून अंधश्रद्धा कर्मकांडावर त्यांनी आयुष्यभर प्रहार केला. गाडगेबाबा हे खरे सर्जनशिल वैज्ञानिक संत होते त्यांच्या जीवनात अंधश्रद्धेला थारा नव्हता.म्हणूनच त्यांनी मंदिरं बांधली नाही तर शाळांसाठी पैसा गोळा करुन कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक कार्याला मदत केली. त्यामुळेच आज एकही वर्ग शाळेत न गेलेल्या या संताचे नाव मोठ मोठ्या डिग्र्या देणाऱ्या विद्यापीठाला दिल्या जाते यावरुन त्यांच्या शिक्षणाची अंतीम पायरी असलेल्या सर्जनशीलतेची प्रचिती येते कारण खुप डिग्र्या मिळवणारा सुद्धा शिक्षणाची ही अंतीम चौथी पायरी पुर्ण केलेली नसते. म्हणजेच खुप झाले तर पहिली पायरी शिक्षित लिहीता वाचता येणे,दुसरी पायरी सुशिक्षित पैसे कमवण्यासाठी डिग्री मिळवणे,तिसरी पायरी सुसंस्कारीत फार तर चांगलं जगता येणे,इतपर्यंतच असते एवढ्याने मानसाचे शिक्षण पूर्ण होत नाही तर शेवटची चौथी पायरी सर्जनशिलता ती म्हणजे सत्य असत्य हे समजने,वैज्ञानिक दृष्टीकोणातून तपासने व सत्य असेल ते स्वीकारने तेव्हाच आपले शिक्षण पूर्ण झाले असे समजू शकतो यासाठी डिग्र्या मिळवल्या पाहिजेच असे नव्हे. हेच मानसाने खरे शिक्षण पूर्ण करावे यासाठी आयुष्यभर झटणारे, दैवाला नाकारुन कर्माला स्वीकारणारे खरे सर्जनशील वैज्ञानिक संत कर्मयोगी गाडगेबाबा होते असे त्यांनी मार्गदर्शनात प्रतिपादन केले.
याप्रसंगी शाळेचे विज्ञान शिक्षक यांनी गाडगेबाबांनी अंधश्रद्धेवर, कर्मकांडावर कसे वार केले याची उदाहरणे देवून प्रत्येकानी वैज्ञानिक दृष्टीकोण स्वीकारावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन वर्ग ५ ची विद्यार्थीनी कु.परी शेळके हिने केले, कार्यक्रमाचे प्रास्तावीक स.शिक्षक संतोष धोटे सर यांनी तर आभार प्रदर्शन स.शिक्षिका रेखा थुटे मॕडम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थीनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close