ताज्या घडामोडी

सोनेगाव येथील घरघुती विद्युत ग्राहकांना कमी दाबाचा विद्युत पुरवठा

नवीन डीपी वरून लाईन सुरू करा, शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

चिमूर नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 सोनेगाव येथील घरगुती मीटर वरील विद्युत पुरवठा कमी दाबाचा होत असल्याने नवीन डिपी वरून विद्युत पुरवठा सुरू करण्यासंदर्भात निवेदन चिमूर शहर शिवसेनाच्यां वतीने महावितरण कार्यालयला देण्यात आले आहे.
चिमूर नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 सोनेगाव प्रभागातील घरघुती विद्युत ग्राहकाच्या विद्युत पुरवठा कमी दाभाचा होत असल्याने टिव्ही बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून, कुलर, पंखे फिरत नसल्यामुळे उष्णतेचा व डेंग्यू मछरांचा त्रास वाढला असून याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, शेतातील डीपि वरून गावातील विद्युत लाईन जोडणी केल्यामुळे विद्युत पुरवठा पुरेसा होत नाही, सोनेगाव करीता कळमगाव वरून आलेल्या नवीन लाईंनचे काम दोन वर्षापूर्वी पूर्ण होऊनही नवीन डीपी वर जोडणी करण्यात आली नाही, करीता चिमूर शहर शिवसेनेच्यां वतीने निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर नीवटे यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले असून सात दिवसात विद्युत पुरवठा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी चिमूर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोंबरे, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर नीवटे, सोमेश्वर उताणे, विजय भोयर, जोगेंद्र उताणे, सौ, रंजना नीवटे, व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close