मादीला आकर्षित करण्यासाठी तो फुलवतो गळ्याखालचा बहुरंगी चमकदार पंखा
प्रतिनिधीःप्रमोद राऊत कराड
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळला फॅन थ्रोटेड लिझार्ड.. अर्थात सरडा सुपरबा..रोहन भाटे यांनी सरड्याला केले कॅमेरात कैद…
रंग बदलणारे सरडे आपणाला सर्वत्र पाहायला मिळतात..रंग बदलणे हा सरड्याचा गुणधर्म…अशा विविध सरड्यांच्या प्रजाती विविध ठिकाणी आढळतात मात्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पठारावर आढळणारा फॅन थ्रोटेड लिझार्ड या नावाने प्रसिद्ध असलेला सरडा सुपरबा या प्रजातीचे वैशिष्ट्य हे निसर्गातलं एक वेगळंच अनोखं समीकरण आहे..
साधारण मध्य मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात मादीला आकर्षित करण्यासाठी हा फॅन थ्रोटेड लिझार्ड आपल्या गळ्याखालचा चमकदार बहुरंगी पंखा फुलवतो…आणि त्याद्वारे तो मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो…सड्यावर आढळणारी एक अनोखी प्रजाती म्हणून फॅन थ्रोटेड लिझार्ड याकडे पाहिले जाते..आणि ती एक खास प्रजाती आहे…मोसमी वनस्पती… पडलेल्या दगड..लहान गुहा… नाजूक परिसंस्थेसह लटकलेल्या खडकांवर असलेल्या लेटरिटीक पठारावर ते आढळतात…अद्वितीय जैवविविधता असलेली सरडा सुपरबा ही प्रजाती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पठारावर आढळणाऱ्या स्थानिक प्रजाती पैकी एक आहे.. या जैवविविधता असणाऱ्या फॅन थ्रोटेड लिझार्ड अर्थात सरडा सुपरबा याने आपल्या गळ्याखाली फुलवलेल्या बहुरंगी पडद्यासह रोहन भाटे यांनी त्याची छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे