गंगाखेड येथे सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन
जिल्हा प्रतिनीधि:अहमद अन्सारी परभणी
परभणी जिल्हयातील गंगाखेड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले.
गंगाखेड नगरपरिषद मध्ये गटारी साजरी केली त्याबद्दल न.प.चे मुख्याधिकारी व नगरसेवक यांना तात्काळ निलंबित करावे या मागणी करिता सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.!
गंगाखेड न.प.चे मुख्याधिकारी यांनी एका दिव्यांग अपंग व्यक्तींवर सुरक्षारक्षक आहे त्याला नोटीस पाठवून त्याच्यावर कारवाई केली, हा संपूर्ण प्रकार लपवण्याचा घाट मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी सुरू केला आहे.
CCTV मध्ये दिसणाऱ्या सर्व नगरसेवक यांच्यावर तात्काळ कारवाई झाली का पहिले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सभाग्रह ज्या नगरसेवकांनी गटारी साजरी केली, यांची हिंमत कशी होते हे एक लोकप्रतिनिधी म्हणतो गटारी साजरी करणारे असे २४ नगरसेवक निवडून द्या. अश्या नगरसेवकाला ०६ वर्षे निलंबित केले पाहिजे.
गंगाखेड नगर परिषद येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सभागृहात लोकहिताचे निर्णय घेतले जातात त्या ठिकाणी बिर्याणी व दारू अशी गटारी पार्टी ज्या नगरसेवकांनी केली यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे गंगाखेड मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी या नगरसेवकांना पाठीशी घातले ते दोघेही दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आज रोजी १० दिवस झाले, येणाऱ्या ०७ दिवसात जर कारवाई झाली नाही तर गंगाखेड शहर बेमुदत बंद राहील असे आंदोलन करुन लेखी उपविभागीय अधिकारी / तहसीलदार यांना कळवण्यात आले.
यावेळी उपस्थित रामप्रभु मुंढे माजी नगराध्यक्ष गंगाखेड, राजकुमार सांवत नगरसेवक, रणधीर राजे भालेराव रि.पा.ई.नेते, गोविंदराव यादव काँग्रेस ता.अध्यक्ष गंगाखेड, बालाजी मुंडे मनसे नेते, विष्णू मुरकुटे शिवसेना नेते, अनिल सातपुते शिवसेना नेते, राम लटके शिवसेना नेते, ज्ञानोबा व्हावळे, सर्जेराव सोन्नर, धोंडीराम जाधव, बालासाहेब पारवे, प्रशांत फड, चिंतामणी साळवे, बाळु बेंद्रे, श्रीकांत कदम, सिद्धांत कांबळे, हनुमान साबळे,अतुल साबळे, कैलास जगतकर सर्व सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते.