ताज्या घडामोडी

आदिवासी शेतमजुर दौलत सरेयाम यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करा

अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद नागपुर ग्रामीण कडुन पोलीस अधीक्षक राकेश जी ओला यांना निवेदण .

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

आदिवासी समाजातील गरीब शेतमजूर असलेले श्री.दोलत सरेयाम हे चांपा,तहसील सावनेर जिल्हा नागपूर येथील शेतमालक श्री.दियेवार यांच्या शेतात गत एक वर्षापासून मजुरी करतो, दिनांक ४/११/२०२० रोजी बकऱ्या चारण्याच्या वादातून श्री.पंकज नरसिंग काकानी व श्री. नरसिंग काकानी रा.नागपूर यांनी बेदमपणे अमानूषरीत्या मारहाण करून कमरेपासून जखमी केले आहे,सदर मारहाण चा व्हिडीओ बऱ्याच प्रमाणात सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे,त्यामध्ये स्पष्टपणे सदर आरोपी सदर आदिवासी इसमास मारहाण करताना दिसत आहे.सदर प्रकरण घडवून आणणारे काकानी परिवार हे त्या भागातील नामवंत आणि संपत्तिवाले असल्यामुळे सदर घटनेला दडपून टाकण्यासाठी प्रयत्नशील आहेत,ते सध्या फरार असल्याने पीडित कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे.पोलिस विभागाने सदर प्रकरणात अनुसूचित जमाती ला सुरक्षा मिळावी या करीता असणाऱ्या अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविणे अपेक्षित आहे.त्यामुळे असले अमानुष कृत्य करण्याचे धाडस सदर आरोपींचे होणार नाही.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद हे संघटन आदिवासींवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात कायमच आक्रमक भूमिका घेत आले आहे,सदर प्रकरणात कठोर कार्यवाही न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.सदर आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.अशी मागणी ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश जी ओला यांना निवेदन द्वारा राहुल मेश्राम ,युवा जिल्हाध्यक्ष (नागपूर,ग्रामीण)अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नवी दिल्ली यांच्या नेतृत्वात व परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी दिनेश शेराम,चंद्रशेखर मडावी यांचे मार्गदर्शनात देण्यात आले या प्रसंगी यशवंत मसराम,राहुल मडावी,सुरेंद्र नैताम,रोशन यादव व अरविंद जी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close