मानवी हक्क दिनानिमीत मानवी हक्क अभियानचे मुख्यमंत्री यांना मागण्याचे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
जागतिक सरनाम्यावर सर्वात प्रथम आपल्या देशाने सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी वचन (शब्द) दिले आहे. आजगायत सन्मानाने जगण्याची प्रक्रिया शासन प्रशासनाच्या वतीने नियोजन बध्द केली नसल्याने मानवी हक्क अभियान च्या वतीने खालील मागण्या चे निवेदन दिनांक 10 डिसेंबर रोजी मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांना परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.
यात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत 1) दलित आदिवासी यांनी सरकारी गायरान/ वनजमिन व पड जमिनीवरील अनेक वर्षांपासून कुटुंब उदर्निवाहासाठी केलेले अतिक्रमण विना अट नावे करून 7/12 देण्यात यावा.2) तेलंगणा कर्नाटक राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील दलित आदिवासी बजेट चा कायदा मंजूर करून ऐ सी . एस टी. व इतर समुदयातील सामाजिक आर्थिक जी दरी आहे याचा दरवर्षी अहवाल नोडल एज॔सी मार्फत करण्यात यावा.3)अर्थसंकल्पात अनु.जाती घटक कार्यक्रम व आदिवासी घटक कार्यक्रमाचा निधी बौध्द, अनु. जातीच्या लोकसंख्येच्या दिला पाहिजे.
4)राज्यस्तरावर देखरेखीसाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा. 5) राज्यामध्ये दररोज दलित आदिवासी वर अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्यास प्रतिबंध घालण्यासाठी अट्राॅसिटी कायद्याची कडक अमलबजावणी करावी व जलद गती न्यायालयाची स्थापना करण्यात यावी
6) सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे.
7) रमाई घरकुल योजनेसाठी ग्रामीण भागात 5लक्ष रूपये तर शहरी भागासाठी 10लक्ष रूपये निधी देण्यात यावाव परिपत्रक ड मध्ये नव्याने नावे समाविष्ट करण्यात यावे.
8) सर्व आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांची तात्काळ निवड करावी व मार्च 2021 अर्थसंकल्पातील निधी वर्ग करण्यात यावा.
9) 60 वर्षे वयोवृद्धांना दर महा 5000रू. मानधन देण्यात यावे व दारिद्र्य रेषेखालची अट रद्द करून आर्थिक उत्पन्न रूपये 20 हजारावरून 50 हजार रूपये करण्यात यावे.
10) प्रत्येक गावात दलित आदिवासी साठी स्वतंत्र स्मशानभूमीची 7/12 ला नोंद करून शेड, रस्ता,लाईट व संरक्षण भिंत उभारण्यात यावी.
11) दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेचे संपुर्ण कर्ज माफ करण्यात यावे व शासनाने दिलेल्या सर्व जमिनी वर्ग 1 मध्ये घेण्यात याव्यात.
12) साहित्य रत्न डाॅ अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मरनोतर भारतरत्न देण्यात यावा.
13)शुक्षित बेरोजगारांना दरमहा 5000रू. भता देण्यात यावा.
सर्व मागासवर्गीय महामंडळा मार्फत शुक्षितबेरोजगारांना रूपये 25 लक्ष रूपये विना तारण व बिनव्याजी कर्ज देण्यात यावे.
14) परभणी येथील लोकशाहीर साहित्य रत्न डाॅ अण्णाभाऊ साठे पुर्णाकृती पुतळयासाठी व शुशोभिकरणासाठी रू 50 लक्ष देण्यात यावे. अदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर मानवी हक्क अभियान परभणी जिल्हा अध्यक्ष पप्पुराज शेळके, रघुनाथ कसबे, मारोती साठे दादाराव कांबळे, गणेश जोगदंड, दिपक भालेराव, अर्चना खरात, रिहानाबी शेख ,छाया गजभार, येणुबाई शेळके, पंचशीला रोडे, निता वाकळे, मुंजाजी सोनटके बंडू दांडगे अदीच्या सह्या आहेत.