अतिवृष्टीची पहाणी न करता सरगट मदत देण्याची माजी आ लहाणे यांची मुख्यमंमत्र्यां कडे मागणी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी,जिंतूर,सेलू,मानवत,सोनपेठ सह जिल्हाभरातील सर्वच शेती पिकांची अतिवृष्टी पाहणी ची वाट न बघता शेतकल्यांना सरसकट मदत जाहीर करा तसेच पीक विमा कंपनी यांना तातडीने पीकविमा वाटप करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी पाथरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी आ हरीभाऊ लहाणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदना व्दारे केली आहे.
दोन आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात माजी आ लहाने म्हणतात की,सप्टेबर महिण्यात संपुर्ण मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी मूळे जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ तालुक्या सह जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून हजारो एक्कर शेत जमीन वाहून गेली असून या जमिनीतील पिके आजही पाण्यात आहेत सोयाबीन, मूग, कापूस, उडीद या पिकांचा शेतकरी बांधवांच्या तोंडातील घास हा पावसाने हिसकवला असून पीक विमा कंपनी कडून सुद्धा कुठलाच प्रतिसाद शेतकऱ्यांना भेटत नसून त्याचे सर्व दूरध्वनी बंद येत आहेत या सोबतच कोणताच जवाबदार अधिकारी शेत पाहणी करण्या साठी येत नसून त्यांच्या कडून सुद्धा कुठलाच प्रतिदास शेतकल्यांना भेटत नाही या मुळे शेतकरी हा पूर्णपने हताश आणि नैराश्यात गेला असून या पुढे काही अनर्थ होण्या आगोदर प्रशासनाने कुठल्याच पाहणी फोटो सत्राच्या भानगडीत न पडता जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ तालुका हा अतिवृष्टी घोषित करून सर्व शेतकरी बांधवाना सरसकट मदत जाहीर करून शेतकरी बांधवाना या आर्थिक संकटातून बाहेर काढावे असे निवेदन पाथरी विधानसभा मतदार संघाचे माजी आ हरीभाऊ लहाणे यांनी दोन आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.