ताज्या घडामोडी

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे चंद्रपूर येथे मंजूर झालेले मुख्यालय गडचिरोली ऐवजी चंद्रपूर येथे करा

अभिजित कुडे
मा.ना.प्राजक्त दादा तनपुरे साहेब राज्यमंत्री. ऊर्जा,नगरविकास,आदिवासी,उच्च तंत्र शिक्षण,आपती व्यवस्थापन यांना निवेदनाद्वारे मागणी

तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा

अनुसूचित जमाती च्या उमेदवारांना शैक्षणिक संस्था,स्वराज्य संस्था निवडणुका व शासकीय सेवा लाभ घेण्यासंदर्भात प्रमाणपत्र जात पडताळणी ची आवश्यकता असल्याने चंद्रपूर येथे अनुसूचित जमाती तपासणी प्रमाणपत्र जात पडताळणी समिती सुरू करण्याची मागणी शासन दरबारी केली असता शासन निर्णय नुसार चंद्रपूर चा समावेश होता परंतु नवीन शासन निर्णय नुसार चंद्रपूर ऐवजी गडचिरोली चा उल्लेख केल्याने अनुसूचित जमाती बांधवात नाराजी पसरली असून गडचिरोली येथील नवीन प्रमाणपत्र तपासणी जात पडताळणी समिती रद्द करून चंद्रपूर येथे सुरू करण्याची मागणी मा.ना.प्राजक्त दादा तनपुरे साहेब राज्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीतील उमेदवार यांना शैक्षणिक क्षेत्रातील शासकीय सेवेत तर स्थानिक स्वराज्य क्षेत्रातील निवडणूक दरम्यान तपासणी जात पडताळणी साठी महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय दि 3 सप्टेंबर 2019 बैठक क्र 236 नुसार आदिवासी विकास विभाग अंतर्गत अनुसूचित जमाती साठी सात अतिरिक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या त्यात
पालघर,नाशिक ,धुळे, किनवट यवतमाळ, गोंदिया व चंद्रपूर या ठिकाणी स्थापन करण्याचा मंत्रिमंडळच्या बैठकीत मान्यता दिली होती. शासन निर्णय क्र एसटीसी 2119 प्र क्र 34 का 10 दि 13 सप्टेंबर 2019 नुसार सध्या अस्तित्वात असलेल्या आठ समित्या व्यतिरिक्त सदर नव्याने केलेल्या सात समित्या व त्यांना सहाय्य करण्यासाठी सात दक्षता पथके स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे
परंतु स्थापन केलेल्या सात जात पडताळणी समित्या मधून धुळे, गोंदिया व चंद्रपूर यांच्या ऐवजी नावात बदल करून त्याऐवजी नंदुरबार(2) नागपूर(2 )व गडचिरोली(2 )करण्यात आली आहे .
शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका व शासकीय सेवेत अनुसूचित जमातीच्या राखीव पदाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराने जात पडताळणी करणे बंधनकारक आहे या प्रकरणाचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी व दळणवळण व आर्थिक भुर्दंड कमी करण्यासाठी दृष्टीने स्थापन झालेल्या मुख्यालयाचे ठिकाण बदल करणे म्हणजे त्या त्या जिल्ह्यातील आदिवासी उमेदवारावर अन्याय केल्यासारखे होईल
अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी प्रमाणपत्र तपासणी जात पडताळणी समिती चंद्रपूर कायम करून गडचिरोली रद्द करण्याची मागणी.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांनी निवेदनातुन केली.
यावेळी नितिन भटारकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस , विलास नेरकर विधानसभा अध्यक्ष , बंडुजी डाखरे , राजेंद्र वरघने , रोशन भोयर
उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close