ताज्या घडामोडी

महाराष्ट्रात आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा

स्वराज्य यात्रेची सुरुवात पंढरपूरातून.

एका भव्य सभेचेही आयोजन; गोपाल इटालियांची राहणार उपस्थिती .

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

गुजरात निवडणूकीनंतर राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रीत केले असून पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी स्वराज्य यात्रेचे आयोजन‌ करण्यात आले आहे.
यात्रेची सुरुवात येत्या 28 मे रोजी पंढरपूर येथील विठ्ठल-रुखमाईच्या दर्शनाने होऊन 6 जून रोजी (राज्याभिषेक दिनी) रायगड येथे या यात्रेची सांगता होणार आहे. स्वराज्य यात्रा सात जिल्ह्यातून जाणार असून या जिल्ह्यातील शहरे व गावांमध्ये सभा होणार आहेत. दरम्यान ही यात्रा तब्बल 782 किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती चंद्रपूर मुक्कामी आपचे‌ जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यांनी दिली.
पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व प्रदेश सह-प्रभारी युवा नेते गोपाल इटालिया‌ ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला गुजरातमध्ये 13 टक्के मतदान मिळवित आपला राष्ट्रीय पक्षाचा. दर्जा मिळाला, त्याच इटालिया यांच्या मार्गदर्शनात ही यात्रा होणार असल्याचे देवराव मुसळे यांनी सांगितले
देशातला आणि जगातली‌ सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणारा भाजप महाराष्ट्रात मात्र हरण्याच्या भीतीने एकही निवडणूक होऊ देत नाही . त्यामुळेच प्रशासन .मनमानी कारभार करते आहे. भ्रष्टाचारावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. या‌ दडपशाही विरोधात आवाज उठवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील‌‌ सुराज्य आणण्यासाठी आम आदमी पार्टी वचनबद्ध आहे.
मागील विधानसभा‌ निवडणुकीनंतर विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने युत्या करत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले. ‌ या सर्वच प्रस्थापित पक्षांची विश्वासार्हता संपली, असल्यामुळेच महाराष्ट्रातील जनता नवीन पर्याय शोधते आहे.. आम आदमी पार्टी आज काम की राजनीती करणारा नवा‌ पर्याय म्हणून‌ समोर येत असल्याचे महानगर अध्यक्ष योगेश गोखरे यांनी म्हटले आहे.

गेले वर्षभर भाजप – शिंदे गटाचे‌ खोक्यांचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे . एकमेकांवरती‌ टीका करताना जनतेच्या प्रश्नांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे अशी भावना शेतकरी, कष्टकरी, गृहिणी, युवक, व सामान्य नागरिकांची झाली आहे. एकीकडे वाढती महागाई असताना शेतकऱ्यांचे, नोकरीचे प्रश्न तसेच शाळा फी दवाखाने आदीं प्रश्नाबाबत प्रस्थापित‌ विरोधी पक्ष सुद्धा आवाज उठवण्यास तयार नाहीत. अशा वेळेस सामान्य जनतेचा म्हणजेच रयतेचा आवाज बनून‌ आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरू पाहत आहे.‌‌
येणाऱ्या वर्षभरात स्थानिक तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. आम आदमी पार्टी आता सर्वच निवडणुका लढवण्याची तयारी करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वेगळ्या गावांमधून पश्चिम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या‌ गावांमधून ही यात्रा काढली जाणार आहे.
‌यात्रे दरम्यान आम आदमी पार्टीचे शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील काम, दिल्ली मॉडेलचे‌ यश आणि फायदे हे जनतेस सांगण्यात येणार आहेत. याच यात्रेच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मजबूत संघटन बांधणीची तयारी आम आदमी पार्टी करीत आहे. स्वराज्य यात्रेनंतर राज्याच्या इतरही भागात अशाच पद्धतीची यात्रा काढण्याचा पक्षाचा विचार असल्याचे जिल्हाध्यक्ष‌ सुनील देवराव मुसळे यांनी सांगितले. या यात्रेत नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close