रेती तस्कराचा सामाजिक कार्यकर्ता कैलास भोयर यांचेवर प्राणघातक हल्ला
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
रेती चोरी ची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याच्या संशयावरून गावातील गुंड प्रवरुत्तीचे प्रशांत उताने, सुनील उताने, ज्ञानेश्वर उताने यांच्या मदतीने रेती तस्कर बबलू रवी जाधव चिमूर व त्याच्या पाच साथीदारांनी सोनेगाव (काग) येथे जाऊन सामाजिक कार्यकर्ता कैलास भोयर यांचेवर प्राणघातक हल्ला केला.
सचिन निखाडे यांनी मध्यस्थी करून आरोपीना पळविले नसते तर अनर्थ घडला असता. तरी सुध्दा मारेकऱ्यांनी कैलाश भोयर चिमूरला दिसता क्षणी खून करण्याची धमकी दिली. आरोपीने या अगोदर सुद्धा महसूल विभाग व वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर त्यांचे घरात जाऊन हमले केले होते. त्यामुळे आरोपींची हिम्मत वाढली असून भ्रष्टाचार व अवैध धंद्या विरुद्ध लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे. रविवार दिनांक २/१/२०२२ रात्री एक वाजता उपविभागीय अधिकारी श्री संकपाल साहेब यांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून नेरी रस्त्यावर सोनेगाव (काग) नदी घाटातील रेती चोरून नेत असलेला आरोपींचा ट्रॅक्टर पकडून जप्त केला. दुसरे दिवशी सकाळी आरोपी बबलू जाधव यांनी सोनेगावातील तीन गावगुंडांना दारूपाजुन् व सोबत पाच सहकार्यांना घेऊन कैलास भोयर यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली त्यात कैलास च्या डोळ्याला तसेच पायाला मुका मार लागला असून असह्य वेदना होत आहे. उपविभागीय अधिकारी यांनी तात्काळ पोलीस ला माहिती देऊन गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत व घटनास्थळाला भेट दिली. तसेच आरोपींना कडक शासन करणार असल्याचे आश्वासन दिले. फिर्यादी भोयर यांच्या तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी आरोपी बबलू जाधव याचे वर 294, 323, 506 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा नोंद केला असून फिर्यादीचे बयाना नंतर इतर आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात येईल असे सांगितले. चिमूर परिसरामध्ये रेती तस्कर, अवैद्य धंदे करणारे गाव गुंडांना हाताशी धरून सामाजिक कार्यकर्त्यावर त्यांचे कुटुंबावर घरात जाऊन हमला करण्याचे प्रकार वाढले आहे. भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यांनी रेती तस्कर यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून यापुढे अशा गुंडांना वठणीवर आणण्याकरिता जशास तसे चोख उत्तर देण्यात येईल असे सांगून हल्ल्यामध्ये समावेश असलेल्या नऊ आरोपींवर पोलिसांनी गुन्हा नोंदवून कडक कारवाई करण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी यांना देण्यात आले असून आरोपी वारंवार गंभीर गुन्हे करीत असून शहरात दहशत पसरवून शांतता भंग करीत असल्यामुळे त्यांना प्रशासनाने त्वरित तडीपार ची कारवाही करावी अशीही विनंती निवेदनाद्वारे केली आहे .