ताज्या घडामोडी

चिमूर विधान सभा क्षेत्रात तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचा यशस्वी शिरकावं

अनेक राजकीय, समाजिक व जागरूक समाज कार्यकर्त्यांनी पक्षात घेतला प्रवेश !

पहिल्याच सभेला शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने उत्स्फूर्त प्रतिसाद !

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

तेलंगना राज्यातील मुख्यमंत्री मा. के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी राज्यात केलेला अभूतपूर्व विकास शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध विकासात्मक योजनांमुळे देशात तेलंगना राज्य अग्रस्थानी पाहून महाराष्ट्रातील जनतेने येथील राजकीय पक्षांच्या कोंबडबाजाराकडे व रोज फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांकडे पाठ फिरविली असून
अब की बार किसान सरकार
अब की बार BRS (भारत राष्ट्र समिती)
अब की बार KCR (मा.मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव)
या घोषणांना अंगीकारून महाराष्ट्रात बळीराजांचे राज्य निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू केला आहे.
BRS (भारत राष्ट्र समिती) पक्षाने चिमूर विधान सभा क्षेत्र समन्वयक या पदावर गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यात सर्वस्वी समर्पित असलेले समाजिक कार्यकर्ते सारंग दाभेकर यांची नियुक्ती केल्या नंतर त्यांनी गावागावात जाऊन व BRS पक्षाच्या ध्येय धोरणांविषयी माहिती देऊन पक्ष वाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले असून दिनांक 10/09/2023 रोज रविवार ला दुपारी 1:00 वाजता रूक्मिणी सभागृह व लॉन नागभीड येथे चिमूर विधान सभा क्षेत्रातील भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाच्या कार्यकर्त्यां सोबत संवाद, आढावा बैठक आणि पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
(BRS) भारत राष्ट्र समिती या नवीन पक्षाच्या पहिल्याच सभेला महिला पुरुष प्रमुख कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद !
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. बाळासाहेब साळुंखे गुरुजी (मा.आमदार) सह समन्वयक पूर्व विदर्भ, मा.वामसिकृष्ण अरीकील्ला जिल्हा समन्वयक आणि अजय रामटेके भद्रावती, दयारामजी कन्नाके माजी पं स सभापती नागभीड यांच्या सोबतच सभेचे मुख्य आयोजक तथा चिमूर विधान सभा समन्वयक सारंग दाभेकर चिमूर, कामिनी मेश्राम, ज्योस्ना गायकवाड मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात अनेक राजकीय, समाजिक व जागरूक नवीन प्रनुख कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
वामसिकृष्ण अरीकील्ला जिल्हा समन्वयक यांनी BRS पक्षाच्या निर्मिती पासून पक्षाच्या ध्येय धोरण व पक्ष प्रमुख KCR साहेबांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या विशेष कार्याबाबत माहिती देऊन पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत च्या सूचना पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिल्या. त्याचप्रमाणे स्वातंत्र्या नंतर शेतकऱ्यांना राजकारण्यांनी केवळ आश्वसने दिली. आणखी किती विश्वास शेतकऱ्यांनी त्यांच्यावर ठेवावा ? त्यापेक्षा ज्या मुख्यमंत्री KCR साहेबांनी तेलंगना राज्यात प्रत्यक्षात योजना राबवून शेतकऱ्यांना 24 तास मोफत विज, शेताला मोफत पाणी, घराघरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नळ, शेतकऱ्यांचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास तीन दिवसात 5 लाख रुपये तात्काळ कुटुंबाला मदत, शेतीच्या हंगामावर एकरी 10 हजार रुपये थेट बॅंक खात्यात जमा, शेतमालाला रास्त भाव आणि सरकार तर्फे बाजार उपलब्ध, विद्यार्थ्यांना 20 लाख रुपये उच्य शिक्षणाकरिता मदत, अशा अनेक योजनांनी शेतकऱ्यांच भलं केलं त्यांच्या BRS भारत राष्ट्र समिती पक्षावर एकदा विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात नवीन राजकीय परिवर्तन घडवून आणलं पाहिजे असे मार्मिक मार्गदर्शन माजी आमदार साळुंखे गुरुजी यांनी केले. तसेच पक्ष वाढीच्या दृष्टीने याचं महिन्यात चिमूर विधान सभा क्षेत्रातील समाविष्ठ सर्व तालुक्यातील आवश्यक त्या संपूर्ण पदांवर लवकरच नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे ही पूर्व विदर्भ सह समन्वयक मा.साळुंखे गुरुजी यांनी सांगितले.
सभा यशस्वी करण्या करिता राकेश बरबटकर, सचिन खाडे चिमूर, राजेंद्र नन्नावरे सोनेगाव (बे), डार्वीन कोब्रा, कैलास भोयर सोनेगाव (काग), यशवंतजी निकुरे कोर्धा, वकील साहेब समीर चौधरी मिंडाळा, चंदन कोसे नागभीड, रमेश मेश्राम सुरबोडी, कैलास सोनुले नवेगाव (हुंडेश्वरी), हरीचंद्र धोंगडे, नितेश वाकडे, कमलाकर धोंगडे काग, सुधाकर पा.दुधनकर बाम्हणी, सचिन शेंडे शंकरपूर, पंकज खोब्रागडे यांनी प्रयत्न केले. तर सभेचे संचालन स्वतःच सारंग दाभेकर समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close