सईद खान यांनी घेतली प्रचारात मोठी आघाडी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी विधानसभेसाठी होत असलेली विधानसभा निवडणूक चुरशीची होत आहे. या निवडणुकीत रा.स.प.चे उमेदवार सईद खान यांनी चांगलीच रंगत आणली आहे. निवडणुका लागल्याच्या पहिल्या दिवसापासून नियोजनबद्ध पद्धतीने कॉर्नर सभा,विविध समाजाच्या स्वतंत्र सभा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या दोन मोठ्या सभा घेऊन प्रचारात मोठी आघाडी घेत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.मुद्देसूद मुद्दे,विकासाच्या बाबतीत वेळोवेळी भाषणात उल्लेख आणि सोबतीला कार्यकर्त्यांची फौज घेऊन सईद खान हे वस्त्या,तंडे व पाथरी सोनपेठ, परभणी आणि मानवत तालुक्यातील सर्वच गावे जंग जंग पछाडून काढत आहेत. यामुळे सईद खान विरुद्ध सर्व उमेदवार अशी लढत पाथरी विधानसभेत निर्माण झाली आहे. त्यात काल मानवत येथे झालेल्या रेकॉर्ड ब्रेक सभेनंतर त्यांच्या आमदारकीच्या विजयावर शिक्का मोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.