ताज्या घडामोडी

प.पू.श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर, पाथरी येथे श्रीगुरुपौर्णिमा उत्सव प्रारंभ

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आज प.पू.श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे श्रीगुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ झाला. प्रथम दिनी पहाटे साडेपाच वाजता श्रीसाईबाबांची काकड आरती नंतर श्रींचे मंगल स्नान झाले नंतर श्रीसाई मंदिरातून श्रीसाई चरित्र ग्रंथाची टाळमृदंगाच्या गजरात मिरवणूक निघाली, या मिरवणुकीत श्री संजय भुसारी, विश्वस्त यांनी श्रींची पोथी घेतली, आर्किटेक्ट श्री सुभाष दळी, विश्वस्त व परम साई भक्त श्री विजयजी पितळे यांनी प.पू.श्रीसाईबाबांची प्रतिमा घेतली, श्री सूर्यभान सांगडे, विश्वस्त यांनी विणा घेतली. त्यानंतर श्री संजय भुसारी, विश्वस्त यांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथ पारायणाला सुरुवात झाली. या अखंड पारायणामध्ये श्री संजय भुसारी विश्वस्त, श्री सूर्यभान सांगडे विश्वस्त, परम साई भक्त श्री राजेंद्रजी कुलकर्णी, सौ सविता कुलकर्णी, सौ सरोज ताई कच्छवे, सीमा कनोजिया दिल्ली व इतर साई भक्तांनी सहभाग घेतला होता.
उत्सवाचे प्रथम दिनी श्री संजय भुसारी यांचे हस्ते साईबाबांची पाद्य पूजा करण्यात आली, श्री सूर्यभान सांगडे, कोषाध्यक्ष विश्वस्त यांचे शुभहस्ते प.पू.श्रीसाईबाबांना महाभिषेक करण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता श्रींची महाआरती, दुपारी साडेतीन वाजता श्री भालचंद्र सरदेशपांडे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले, सायंकाळी सुर्यास्ताच्या वेळी राम रक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र व नंतर धुपारती होईल, सायंकाळी सात वाजता श्रींची पालखी निघेल.
अशी माहिती श्री संजय भुसारी विश्वस्त यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close