ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील शेतकर्यांना खरीप हंगाम २०-२१ पिक नुकसान भरपाई(परतावा) मिळवून द्या

आमदार जोरंगेवार यांना आप चंद्रपुर चे संघटनमंत्री श्री सुनील भोयर यांची मागणी.

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

आपल्याला माहीतच आहे की कृषी विभाग म्हणजेच सरकार मध्यस्थी असल्यामुळे शेतकरी विमा कंपनीकडून पिक विमा काढत असतो. खरीप हंगाम २०२०-२१ ला देखील आम्ही शेतकऱ्यांनी खरिप पिकांचा विमा भरला होता. याच हंगामात पिक काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाली, त्यामुळे सरकारनं पंचनामे करून थोड्या प्रमाणात नुकसान भरपाई देखील दिली.ज्याअर्थी सरकारने नुकसानभरपाई दिली त्याअर्थी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे हा पुरावा आहे, असे असून देखील विमा कंपनी पिकाची नुकसान भरपाई (परतावा) देण्यास विलंब करत आहे.
विमा कंपनीने नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर पंचनामे करून नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे, परंतु विमा कंपनी पंचनामे पूर्ण करू शकली नाही.
त्यामुळे कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी ५ मार्च रोजी एक परिपत्रक म्हणजेच आदेश जाहीर केला, त्यात त्यांनी नमूद केले की जर विमा कंपनी पंचनामे करण्यास असफल ठरली असेल, तर सरकारने केलेले पंचनामे ग्राह्य धरुन शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. असा आदेश असून देखील विमान कंपनी या आदेशानुसार कारवाई करण्यास राजी होतांना दिसत नाही आणि कृषी विभाग मध्यस्थी असल्यामुळेच आम्ही शेतकरी प्रत्यक्ष विमा कंपनीला जाब विचारु शकत नाही. त्यामुळे आम्हाला विमा कंपनी कडून पिकांची नुकसान भरपाई (परतावा) मिळवून देण्याची सर्वस्वी जबाबदारी ही कृषी विभाग म्हणजेच सरकारची आहे.
विमा परतावा मिळण्यास विलंब लागत असल्यामुळे सरकारचं आणि विमा कंपन्यांचं साटंलोटं आहे की काय, असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
सध्या खरिपाच्या पेरणीला सुरुवात होत आहे, कोरोना महामारी मुळे आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत आहे, त्यामुळे बियाणे व खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. तरी आम्हाला आमच्या हक्काचे नुकसान भरपाई विमा कंपनी कडून मिळावे, यासाठी विमा कंपनी ला सरकारने आदेश देवून नुकसान भरपाई (परतावा) मिळवून द्यावी, हीच विनंती.
अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल.त्यात आम आदमी पार्टी महाराष्ट्र चंद्रपुर अग्रभागी राहील असा इशारा पार्टीचे संघटनमंत्री तथा इंचार्ज आप चंद्रपुर श्री सुनील रत्नाकर भोयर ,शहर सचिव श्री राजू कुडे यांनी चंद्रपुरचे आमदार श्री किशोर जोरगेवर यांना दिलेल्या निवेदनातून कळविले आहे.यावेळेस पार्टीचे श्री वामनराव नांदूरकर,जेष्ट पदाधिकारी; श्री बबन कृष्णपल्लीवार सहसंयोजक;श्री अजय डुकरे,सहसचिव; श्री सिकंदर सांगोरे,सहसचिव; श्री देवकी देशकर महिला आघाडी;सौ वर्षा सुनील भोयर;सौ वैशाली डोंगरे; श्री प्रशांत येरने;श्री योगेशआपटे,सहसंयोजक;श्री दिलीप तेलंग; श्री राजेश चेडगूलवर,सोशल मिडिया;श्री संदीप तुरक्याल ,झोन-2 अध्यक्ष; श्री मधुकरराव साखरकर; श्री सुखदेव दारुनडे इत्यादींची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close