ताज्या घडामोडी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सविधांन सभेतील अंतिम भाषण नागरिकांनि जागरूक होऊन वाचावे -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा

बार्टी तर्फे संविधान साक्षर ग्राम मालेवाडा समारोपिय कार्यक्रम प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पाडला त्यावेळी ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी संविधानाप्रति नागरिकांचे कर्तव्य या विषयावर बोलत असताना म्हणाल्या की संविधानातील हक्क व प्रतिष्ठा साठी नागरिक आग्रह करतात तसेच कर्तव्यप्रति सुद्धा आग्रह धरला पाहिजे व्यक्ती स्वतंत्र हे व्यक्ती स्वार्थ साठी परावर्तित करणे धोकादायक आहे म्हणून या देशयाची बंधुत्व स्वतंत्र ,लोकशाही मूल्य जर जोपासायची असतील तर प्रत्येक नागरिकांनि संविधान सभेत ड्रा बाबासाहेबांनी आपल्या अंतिम भाषणात जो मोलाचा संदेश दिला सविधांनाप्रति ते सर्व नागरिकांनि जागरूक राहून वाचावे व अंमलात आणावे असे प्रतिपादननच बार्टी च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी सविधांन साक्षर समारोपीय ग्राम येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या प्रमुख मार्गदर्शनात नागरिकांना आवाहन केले पुढे बोलतांना बार्टी च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की बाबासाहेबांनी सांगितले की व्यक्ती किती ही मोठा असला तरी त्यांच्या पुढे आपले स्वतंत्र गमावता कामा नये कुठेलेही राजकीय पक्ष अशो किंवा काही देशयातील नागरिक अशोत जर स्वतःच्या तत्व प्रणालीला जर देश्यापेक्ष्या मोठे मानत असेल तर स्वतंत्र धोक्यात येईल तेव्हा आपल्या स्वतंत्र च्या रक्षणासाठी आपण निर्धाराने लढलेच पाहिजे देश सर्वत्र व देशहितच सर्वोच्च मानून जबाबदारी पार पाडणे हीच नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यची नैतिकता आहे संविधानातील कलम 51 अ समाविष्ट करण्यात येऊन त्यात मूलभूत कर्तव्य चा समावेश करण्यात आला आहे राज्यघटनेचा आदर करणे,तिचे पालन करून त्यातील आदर्श पुढे ठेवून वर्तन करणे,भारताची एकता व एकात्मता कायम राहण्यासाठी वर्तन करणे,राष्ट्र, राष्ट्र ध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय स्वतंत्रलढ्याला प्रेरक आदर्श यांचे अनुकरणं करणे संस्कृती जोपासणे, राष्ट्रीय सेवा,भाषिक ,प्रादेशिक धार्मिक,वर्गीय भेदाभेद न पाळणे स्त्रीयांची प्रतिष्ठा वाढवणे,एकात्मता, बंधुभाव, मानवता,वैज्ञानिक दृष्टीकोन सुधारणा पर्यावरण संरक्षण इत्यादी कर्तव्याची माहिती सुद्धा समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी यावेळी दिली या कार्यक्रमाचे अद्यक्ष सरपंच कालिदास भोयर,उपसरपंच शंकर दडमल, पोलीस पाटील, हेमंत गजभिये ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जिवतोडे,जगदीश रामटेके, वर्षा दोडके, शारदा मेश्राम, मुख्याध्यापिका सुनंदा तुरारे,स्मिता राऊत धनविजय मुंढरे, पंधरे,सर आशा वर्कर कलावती नांनवरे करिश्मा शेंडे मंजुळा ननावरे शशिकला कुमरे आदि उपस्थित होते तर कार्यक्रमाचे संचालन अंगणवाडी सेविका ललिता वरखेडे यांनी केले तर आभार राशिका चोधरी यांनी मानले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close