प.पू. तुकाराम दादा गीताचार्य यांची पुण्यतिथी तिथीप्रमाणे

प्रतिनिधी :रामचंद्र कामडी
मो.7620892397
कर्मयोगी परमपूज्य तुकाराम दादा गीताचार्य हे संत होते. त्यांची पुण्यतिथी ही तिथीनुसार करण्यात यावी. या सारंग दाभेकर यांच्या विषयावर सभेत सर्वांनुमते ठरावं करून दादांची पुण्यतिथी तिथीनुसार म्हणजे ज्येष्ठ शुद्ध द्वादशी दिनांक 11/06/2022 रोज शनिवार ला सायंकाळी सामुदायिक प्रार्थने नंतर मौन श्रद्धांजली अर्पण करून साजरी करण्यात येईल असे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम, मोझरी अंतर्गत श्री गुरुदेव आत्मानुसंधान भू-वैकुंठ अड्याळ टेकडी चे अध्यक्ष मोरेश्वर उईके यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे. आत्मानुसंधान भुवैकुंठ अड्याळ टेकडी येथे
दिनांक 7 ते 11 जुन, 2022 पर्यंत पाच दिवसीय चालणाऱ्या पुण्यतिथी उत्सवामध्ये गुरुपद गुंफा, दादांची समाधी आणि दादांचे आसन स्थानाची फुलांनी सजावट, भजन, किर्तन, रामधुन, सामुदायिक ध्यान, प्रार्थना, श्रमदान, संकल्प, अध्यात्म गुरुकुल, ग्रामगीता दर्शन मंदिर व इतर आश्रमातील कार्यवृत्त अहवाल, तसेच पुढील कार्याचे नियोजन, पाहुण्यांचे श्रद्धांजलीपर मार्गदर्शन व महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित केले असून पुण्यतिथीला नाना महाराज परसवाडा, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मणजी गमेे सचिव जनार्दन पंत बोथे, ग्रामगीता तत्वज्ञान दर्शन मंदिर पंढरपूर चे सचिव भुते गुरुजी, प्रचार प्रमुख दामोदर पाटील, अशोक चरडे गुरुजी, राजु देवतळे हे उपस्थित राहणार आहेत. तुकाराम दादांच्या कार्यावर आणी दादांवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी पुण्यतिथी महोत्सवाला तन-मन-धनाने सहकार्य करावे असे आव्हान पुण्यतिथी उत्सव समिती प्रमुख चेतन कवाडकर यांनी केले आहे.