मनिपुर महिलांची धिंड प्रकरणी भाकपचे निदर्शने

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मनिपुर राज्यात उसळलेल्या जातीय आगडोंब व आदिवासी महिलांना विवस्त्र करून सामुहिक बलात्काराच्याघटना उघडकीस येत असुन मानुसकीला काळीमा फासणारी घटना रोखण्यास मनिपुरचे विरेनसिंह सरकार व केंद्रातील मोदी सरकार अपयशी ठरले असल्याने पाथरी तहसील समोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.मनिपुरमधील निरपराध जनतेला आपला खंबीर पाठिंबा दर्शविण्यासाठी निरपराध महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ व सरकारच्या अपयशी धोरणाच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २५ जुलै रोजी देशपातळीवर आंदोलनाची हाक दिली होती त्या अनुषंगाने पाथरी तहसील समोर तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी भाकपचे ज्ञानेश्वर काळे, श्रीनिवास वाकनकर, अनिता दुपटे,भारत गायकवाड, ज्ञानेश्वर रबउद , कालिदास कोल्हे,कोंडीराम घाटगे, शिवाजी लिपने, महादेव रबुद उपस्थित होते.
