मनपाच्या सुंदर माझे उद्यान स्पर्धेत प्रार्थना गुरुदेव सेवा मंडळ व प्रार्थना मंदिर योग कक्षाचा सहभाग !

बबन अनमुलवार व अर्पणा चिडे यांची टीम घेतेय या स्पर्धेसाठी अथक परिश्रम
प्रतिनिधिःरामचंद्र कामडी
चंद्रपूर महानगरपालिकेच्या
“सुंदर माझे उद्यान “स्पर्धेत
प्रार्थना मंदिर गुरुदेव सेवा मंडळ आणि प्रार्थना मंदिर योग कक्षा द्वारका नगरी राऊत ले आऊट मध्ये नित्य सकाळी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ध्यान प्रार्थना आणि योगा प्राणायाम करून या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे . आयोजित विविध उपक्रमात श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बबन अनमुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपासक आणि उपासिका तद्वतच महिला पतंजली योग समितीच्या योग शिक्षिका जिल्हा महामंत्री अपर्णा प्रवीण चिडे ,रामराव धारणे, देवराव बोबडे ,पुंडलिक रोडे , भास्कर भोकरे संतोष राऊत,भास्कर इसनकर , नामदेव गाडगे शालिनी धारणे शुभांगी अनमुलवार,लता उपरे,शालिनी भोंग, शिला आमडे,.लता विरुटकर ,शारदा रोडे .मंगला श्रीरामे आदीं तनमनाने कार्यरत झालेल्या आहेत.उद्यानातील सदरहु उपक्रमात सौंदर्यीकरण, लोकसहभाग, आरोग्य विषयक उपक्रम, जनजागृती, वृक्षारोपण, कच-याचे वर्गीकरण या व्यतिरिक्त पर्यावरणवर आधारित व लोकोपयोगी उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे महिला पतंजली योग समितीच्या योग शिक्षिका अर्पणा चिडे यांनी आज आमच्या प्रतिनिधीस चंद्रपूर मुक्कामी एका भेटीत सांगितले.