ताज्या घडामोडी
वरोरा येथे रेल्वेने कटून युवकाची आत्महत्या
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा शहरातील चीरघर प्लाट येथील रहिवासी गणेश मधुकर भाकरे वय 23 वर्ष या युवकांनी एकार्जुना चौक जवळील असलेल्या दिल्ली चेन्नई डाऊन रेल्वेमार्गावर पोल क्रमांक 832 बी /24 येथे आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. घरी मित्रांना भेटून येतो असे सांगून गणेश घराबाहेर पडला. एकार्जुना चौकात आपले दुचाकी वाहन ठेवून रेल्वेमार्ग कडे गेला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
गणेशाच्या कुटुंबीयांत आई व दोन बहिणी असून गणेश हा नागपूरला शिक्षण घेत होता. गणेश ने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप काही कळु शकले नाही. घटनास्थळी रेल्वे पोलीस पोहोचून प्राथमिक अहवाल नंतर वरोरा पोलिस विभागाकडे तपास सुपूर्द करण्यात आला आहे.