जि प क्षेत्र कवलेवाडा (तिरोडा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न
प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा
आज जिल्हा परिषद क्षेत्र कवलेवाडा अंतर्गत ग्राम मुंडीकोटा येथिल सत्यसाईबाबा सभागृहामध्ये कार्यकर्ता बैठकीचे आयोजन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेत व जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली.
आगामी विधानसभा निवडणुक काही दिवसांनी लागू होणार आहे. त्यापूर्वी पक्षाचे विविध घटक अथवा आघाडीतील पदाधिकारी यांनी प्रत्येक गावातील कार्यकत्यांपर्यंत पोहचून जिथे बूथ कमेटी यादी तयार झाली नसेल तिथे बूथ कमेटी तयार करावी. पक्ष वाढीकरिता लोकांना संघटनेशी जोडण्याचे काम करावे. खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या माध्यमातून या क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबध्द असुन शेतकऱ्यांना बोनस, कृषी बिल माफ, सिंचन, लाडली बहीण योजना, अदानी प्रकल्प यासारखे झालेले विकास कार्य जनतेपर्यंत पोहचण्याचे काम करावे. खा. प्रफुल पटेलजी यांचा जो निर्देश असेल त्यानुसार महायुतीतील उमेदवार यांच्या पाठीशी राहून काम करायचे आहे असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
सर्वश्री सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, योगेंद्र भगत, देवचंद ठाकरे, कैलास पटले, मनोज डोंगरे, किरण पारधी, जगदीश बावनथडे, पिंटू चौधरी, अतुल भांडारकर, जयाताई धावडे, निताताई रहांगडाले, रामसागर धावडे, संभाजी ठाकरे, मनोहर राऊत, संदीप मेश्राम, किशोर पारधी, रंजित मेश्राम, नंदकिशोर शरणागत, किरण बन्सोड, बबन कुकडे, अल्केश मिश्रा, गणेश रहांगडाले, किरण वैद्य, प्रभाताई राऊत, राजेश तायवाडे, दहीकरजी, यासिन छवारे, अजय नंदागवळी, रिता पटले, किशोर पारधी, राजेश पसेने, बंडू रहांगडाले, दिलीप भैरम, अजब भोयर, बापू कनासकर, अमुल राहूल, मायाबाई पटले, रतिराम पारधी, रामदास पारधी, देवनबाई पारधी रौनक ठाकुर सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.