ताज्या घडामोडी

बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा ब्रह्मपुरी चे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन

उपसंपादक: विशाल इन्दोरकर

महाराष्ट्र राज्यात कोरोनाची परिस्थिती आहे हे आम्हाला मान्य आहे तरीपण शिक्षण सोडता सर्व जनजीवन सुरळीत सुरू आहे. राज्यातील सर्व सभा, कार्यक्रम, संमेलन, बाजार, बससेवा, रेल्वे, दारू दुकाने व इतर सर्व सेवा सुरु आहेत. त्याचप्रमाणे सर्व शाळा व महाविद्यालये सुरू करावे. जर शाळा असेच बंद राहिल्या तर येणारी पिढी,समाज व देशाचेच भवितव्य धोक्यात येईल.कारण आजचे विद्यार्थी उद्याचे भवितव्य आहेत. म्हणून विनंती आहे की एक आठवड्याचा आत आपल्या महाराष्ट्रातील शाळा व कॉलेज सुरू करण्यात यावे अन्यथा बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा एक आठवड्यानंतर ब्रह्मपुरी च्या प्रत्येक चौकात शाळा लावून मुलांना शिकवण्याचे काम करेल आणि याला सर्वस्वी जबाबदार शासन – प्रशासनच असेल असा इशारा ही देण्यात आला.
निवेदन देताना रोशन मेंढे विधानसभा अध्यक्ष, प्रगती शेंडे विद्यार्थीनी प्रमुख, संगम मेश्राम तालुका अध्यक्ष, निखील रामटेके उपाध्यक्ष, अंकित घोडेस्वार सचिव, धम्मदीप रामटेके कोषाध्यक्ष, पल्लवी मेश्राम मिडिया प्रभारी, राजेश्वरी लोखंडे, अमर रामटेके, नितीन फुलझेले, ममता मेश्राम, अविनाश तुपटे, चेतना कौरवते, सिमरन नगराळे, प्रेमानंद कुथे, किशोर प्रधान, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close