ग्रामीण रुग्णालय,पाथरी येथील सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय कायाकल्प बक्षिसेस पात्र

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
नुकत्याच आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी कायाकल्प बक्षीस साठी पात्र आरोग्य संस्थेचे नाव जाहीर करण्यात आले. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये

कायाकल्प उपक्रमाची ची अंमल बजावणी संपूर्ण राज्यातील ग्रामीण जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय,सामान्य रुग्णालय,स्त्री रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र या ठिकाणी तर शहरी/नागरी ठिकाणी असलेले नागरी समूदाय आरोग्य केंद्र आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आली.
सदरील उपक्रमाचे उद्देश चांगली आरोग्य व्यवस्था स्थापन करणे,केंद्र शासन/राज्य शासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसेच मार्गदर्शनचे अंमलबजावणी करणे,जेणेकरून ग्रामीण,अती दुर्गम भागातील रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवितात येईल.
त्या अनुषंगाने महारष्ट्र राज्यातील एकूण 19 जिल्हा रुग्णालय,152 ग्रामीण रुग्णालय,548 प्राथमिक आरोग्य केंद्र,935 उपकेंद्र,5 नागरी समूदाय आरोग्य केंद्र,50 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चे अवलोकन करण्यात आले.
सदरील संस्थेचे अवलोकन करतांना दिशा निर्देशित करण्यात प्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही,वेळी वेळी पुरविण्यात आलेल्या मार्गदर्शन सूचना प्रमाणे रुग्णांना सुविधा भेटते किंवा कसे,आरोग्य कर्मचारी यांचे रुग्णांशी वागणूक,अत्यावश्यक तसेच दैनंदिन आवश्यक असलेल्या औषधांची उपलब्धता,सुरक्षित प्रसूती,प्रसूती पश्चात स्त्रियांना मोफत विविध सुविधा,लाभार्थ्यांना लाभ,नवजात बालकांना उपलब्ध आरोग्य सुविधा,रुग्णालय व रुग्णालायीन परिसर स्वच्छता,आवश्यक मनुष्यबळ इ बाबींचे अवलोकन करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालय,पाथ्री येथे देखील कायाकल्प अंतर्गत अवलोकन करण्यात आले.
अवलोकन दरम्यान ग्रामीण रुग्णालय,पाथ्री येथील सर्व सोई,सुविधा इ बाबत आढावा घेण्यात आला.तसेच अवलोकन दरम्यान सर्व उच्च सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
त्यामुळे ग्रामीण रुग्णालय पाथ्री ला सुविधा पुरविताना कायाकल्प चे बाह्य अवलोकानचे भाग असलेले कायाकल्प आणि इको फ्रेंडली मध्ये उत्कृष्ट कर्मगिरी केली असून सदरील कारकीर्दगी मुळे ग्रामीण रुग्णालय,पाथ्री है बक्षिसेस पात्र ठरल्या असल्याचे प्रशस्तीपत्र मा.आयुक्त,आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान ,महारष्ट्र यांनी त्यांचा दिनांक 12/03/2024 रोजीच्या पत्राद्वारे कळविले आहे.
सदरील अवलोकन यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मा. डॉ्.सुमंत नागनाथराव वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शना लाभले.
तसेच डॉ्.सुमंत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.आर से जाधव, डॉ.से एन धाबाले, डॉ.महाजन ,अधीपरीचारिका श्रीमती. शोभा गुडमे,श्री.अरुण गव्हाणे,श्री.गणेश गिरी,श्रीमती.मिणा घुगे,श्रीमती.शीतल ससाणे,श्रीमती. कोथाळे,श्रीमती.अंजना मुंडे,सहाय्यक अधिक्षक श्री.एम.के.खराते ,कनिष्ठ लिपिक श्री. व्ही जी धायजे,औषध निर्माण अधिकारी श्री.सलीम शेख ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री काळे,श्री.रामचंद्र जोगदंड व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
तसेच जिल्हा स्तरावरून डॉ.तपसे सर यांचे वेळोवेळी सक्रिय मार्गदर्शन लाभले.