दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पध्दतीने च घ्या

मनवीसे वरोरा चे शिक्षण मंत्र्यांना तहसीलदार मार्फ़त निवेदन
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
महाराष्ट्रभरात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घ्याव्या यासाठी शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वरोरा च्या वतीने तहसीलदार वरोरा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पध्दतीने सुरू असेल तर पेपर ही ऑनलाइन पध्दतीने घेण्यात याव्या अन्यथा विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वरोरा तर्फे देण्यात आला आहे.निवेदन देते वेळी मनसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी,शहर उपाध्यक्ष कुणाल गौरकार, शहर संघटक श्रीकांत तळवेकर विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अभिजित अष्टकार,
कपिल बांदुरकर, प्रतीक मुडे ,अनिकेत जुनघरे , योगेश ताजने संस्कार कोरेकर , ,गणेश मांडवकर,प्रज्वल निकुरे,लखन हिमांशू भगत महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.









