ताज्या घडामोडी

रवींद्र तिराणिक यांनी घेतली मनसेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची भेट

राज साहेबांनी तिराणिक यांच्या कलाअकादमीच्या कार्याची केली प्रशंसा.

महाराष्ट्राच्या दौऱ्यात विविध बहुआयामी विषयांना हात घालीत जिल्ह्यात कार्यकर्ता पदाधिकारी व युवकांमध्ये उर्मी निर्माण करीत संघटनात्मक व मजबूत पक्ष बांधण्याची भूमिका!

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

चंद्रपूर आदिवासी बहुल जिल्ह्यात गेली पंचवीस वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, कला व साहित्य इतर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणाऱ्या रवींद्र तिरानिक याच्या कार्याची व कलाकादमीच्या नेतृत्वाचे दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांनी प्रशंसा केली. सर्व सामान्य तळागाळातील कार्यकर्ते पदाधिकारी नवीन युवावर्ग जोश कुशल नेतृत्व व संवाद यांना शिस्तबद्ध कार्यप्रणालीची संघटनात्मक पक्षाची उर्मी निर्माण करीत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना एनडी हॉटेल मधील चंद्रपूर गडचिरोली व यवतमाळ पदाधिकाऱ्यांच्या संवाद बैठकीनंतर रवींद्र तिरानिक यांनी मा. राज साहेबांची वैयक्तिक भेट घेतली. या भेटीत चंद्रपूर जिल्ह्याच्या कलाविषक उपक्रमाची माहिती राज साहेब ठाकरे यांनी जाणून घेतली. चंद्रपूर जिल्ह्यात कला दालन निर्माण व्हावं. कलावंतांना विविधप्रदर्शनीकरिता हक्काचे व्यासपीठ निर्माण करावं .अनेक बेरोजगार कलावंतांना रोजगाराची वेगवेगळ्या प्रक्रियेतून संधी निर्माण व्हावी. या दृष्टीने रवींद्र तिराणिक यांनी राज साहेबाकडे भूमिका मांडली . कलाविषयक बाबी संदर्भात मुंबईला येण्याचं विचार व्यक्त केला. भेटी प्रसंगी कला अकादमीच्या वतीने आदिवासी वारली पेंटिंग व हस्तकलेच्या निर्मिती मधून तयार ग्रीटिंग्स राज साहेबांना भेट देण्यात आले राज साहेबांनी रवींद्र तिराणिक यांच्या विविध उपक्रमाची व प्रदीर्घ कार्याची कार्याची प्रशंसा करीत मुंबईला येण्याचे मानस व्यक्त केला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close