चिमूर येथे घोडा यात्रा निमित्ताने नाटकाचे आयोजन
मुख्य संपादक: कु.समिधा भैसारे
चिमूर क्रांती नाट्य रंगभूमी चिमूर/ वडसा यांचे वतीने घोडा यात्रा काला निमित्ताने मौजा वडाळा (पैकु) चिमूर येथील न्यू राष्ट्रीय प्रेरणा कान्वेंट येथे संगीत किनारा या तीन अंकी नाट्य प्रयोगाचे आयोजन दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोज गुरुवार ला रात्रौ 10.00 वाजता करण्यात आलेले आहे.
सदर नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विषयावर मांडणी केली आहे तसेच लावणीप्रधान व क्षणाक्षणाला विनोदांनी बहरलेले आहे.
संगीत किनारा या नाट्य प्रयोगाचे आयोजन चिमूर येथील चिमूर क्रांती नाट्य रंगभूमी चिमूर/वडसा यांनी केले असून या नाटकाचे लेखक श्री. सुरेश रामटेके आहेत.
या नाट्यप्रयोगात झाडीपट्टीच्या नावाजलेल्या व कसलेल्या कलावंताचा समावेश आहे त्यामध्ये मा. विजय नरचूरवार (गडचिरोली) मा. उत्तम उके (साकोली) मा.सिने.अमोल मोडक मा.नितीन साखरे (गोरेगाव) मा. मुन्ना बोपचे (गोंदिया) मा. उमेश ढोक, मा. हेमचंद बोरकर तसेच स्त्री कलावंत मिस. अनु (वडसा), मिस. मधू (चंद्रपुर), मिस. नंदिनी (चंद्रपुर) मिस. वैष्णवी (यवतमाळ) बाल कलावंत साहिल कुमार आहेत.
चिमूर परिसरातील जास्तीत जास्त जनतेने या नाट्य प्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष श्री.संदीप बोबडे, उपाध्यक्ष श्री. हेमचंद बोरकर, सचिव श्री. गोकुल सिडाम, कोषाध्यक्ष श्री. अमोल मोडक यांनी केले आहेत.