जय ज्योती युवा क्रिकेट क्लब नवेगाव यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन..!!

प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी तालुक्यात येत असलेल्या नवेगाव येथे जय ज्योती युवा क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला, दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.पहिला पारितोषिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांच्या तसेच दुसरा पारितोषिक सौ शाहीन भाभी हकीम यांच्या तसेच तिसरा बक्षीस प्राचार्य लोनवबले सर हस्ते देण्यात येत आहे.
आज सदर स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार श्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. सहउदघाटक म्हणून सौ माननीय शाईन भाभी हकीम राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष गडचिरोली होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बबलू भैया हाकीम, राजु सावकार उत्तरवार .प्रभाकर शेंडे .अरविंद खोब्रागडे .आदिल भाऊ पठाण .लोनबले सर .कैलास कोरेत. लक्ष्मण येरावार . सत्यनारायण मेरगा. नंदू तेलामी सरपंच किष्टापुर वेल उपसरपंच पवन आत्राम . अनिल दब्बा .भगवान आत्राम. राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार ग्रामपंचायत आलापल्ली सदस्य पुष्पाताई अलोने आदि मंचावर उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण कोटरंगे. सचिव छोटू झाडे .उपाध्यक्ष संजय गुरनुले. सहसचिव प्रकाश गुरनुले .पंच म्हणून यादव झाडे रवी बोरले तसेच कोषाध्यक्ष भगवान गुरनुले विजय देवराव आदे या कार्यक्रमाचे संचालन श्री वामन सर तसेच प्रस्ताव संजय गुरनुले यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.