ताज्या घडामोडी

बुथ पालकांनी मान.नरेंद्रजी मोदी यांनी नववर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा गौरव जनतेपर्यंत पोहोचवा-__खासदार अशोक नेते

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

दि.११ सप्टेंबर २०२३ला
भारतीय जनता पार्टी,आरमोरी विधानसभा क्षेत्र च्या वतीने महा विजय – 2024 मोदी @ 9 महाजन संपर्क अभियान.बुथ पालक मेळावा* सिंधु भवन हुतात्मा स्मारक च्या मागे,देसाईगंज (वडसा)येथे आयोजित करण्यात आले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाभाऊ गजबे,जेष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक तथा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष बबलुभाई हुसैनी,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पारधी,जिल्हा संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, तालुकाध्यक्ष राजु जेठानी, उपस्थित होते.

या मेळाव्याला खासदार अशोक जी ‌नेते यांनी बोलतांना बुथ पालकांनी मेरी माटी मेरा देश या माध्यमातून प्रत्येकांनी आपल्याला घरोघरची माती जमा करुन देश सेवेचा सन्मान व देश सेवा निर्माण करण्यासाठी अभियानात सहभागी व्हावे व महा जनसंपर्क अंतर्गत घर चलो अभियान व सेवा पंधरवाडा उपक्रम राबवा असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी बुथ पालकांना केले.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांनी नववर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा गौरव जनतेपर्यंत पोहोचवा.तसेच बुथ पालकांनी घर चलो अभियान,मेरी माटी मेरा देश या अंतर्गत प्रत्येक घराघरांमध्ये केलेल्या कामाचे पत्रक व केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवा,सेवा पंधरवडा कार्यक्रम प्रत्येक बुथांवर राबवा. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार होत असलेली मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांची मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक बुथांवर आयोजित करावे. असे प्रतिपादन या मेळाव्याप्रसंगी खासदार अशोक जी नेते यांनी केले.

पुढे बोलतांना खासदार महोदयांनी देशाचे पंतप्रधान मान.श्री‌ नरेंद्र मोदी जी साहेबा़चा वाढदिवस येत्या १७ सप्टेंबर २०२३ ला असून त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये सेवा पंधरवाडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आपण सुद्धा सेवा पंधरवाडा हा उपक्रम संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये राबवायचं आहे.असे याप्रसंगी खासदार अशोक जी नेते यांनी बुथ पालक मेळाव्याला
केले.


यावेळी देसाईगंज (वडसा) येथे प्रत्येक घराघरांमध्ये घर चलो अभियानांतर्गत जनसंपर्काचे पत्रक खासदार अशोकजी नेते, आमदार कृष्णाभाऊ गजबे व जेष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, उपनगराध्यक्ष बबलुभाई हुसैनी,जिल्हा संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे यांच्या प्रमुख हस्ते व उपस्थितीत घर चलो अभियान पत्रक वितरीत करण्यात आले.

सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत येणारे कार्यक्रम खालील प्रमाणे .
आयुष्यमान भारत कार्ड अभियान
अंतर्गत आयुष्यमान कार्ड नोंदणी दिनांक 17 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर पर्यंत प्रत्येक बुथ वर राबवणे.
प्रदर्शनी अभियान
माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेले कामाची प्रदर्शनी प्रत्येक बुथ वर करणे.
वस्ती संपर्क अनु.जाती,अनुसूचित जनजाती,अल्पसंख्यांक अभियान
केंद्र सरकारने अनु.जाती, अनुसूचित जनजाती,अल्पसंख्यांक जाती साठी नऊ वर्षांमध्ये केलेल्या कामांची माहिती व योजनांची माहिती 26 सप्टेंबर ते 1 आक्टोंबर पर्यंत वस्ती संपर्क अभियानांतर्गत प्रत्येक बुथ वर राबवणे.
स्वच्छता अभियान
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त स्वच्छता अभियान 25 सप्टेंबर ते 2 आक्टोंबर पर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक बुथ वर राबवणे.
रक्तदान, आरोग्य शिबिर अभियान
देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते दोन आक्टोंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करने.
पंडित दीनदयाळ जयंती व बूथ संपर्क अभियान
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे 25 सप्टेंबर 2023 ला जयंती असून या जयंतीदिनानिमित्त बुथ संपर्क,संपर्क से समर्थन,अभियान घर घर चलो अभियान प्रत्येक बुथवर राबवणे.
बुथ सशक्तीकरण अभियान
दि.२५ सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सर्व बुथांचे समित्या तयार करून बुथ सशक्तिकरण करणे.
या प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व बूथ पालक व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close