ताज्या घडामोडी

जबाबदारी टाळणाऱ्या राज्य सरकारला धडा शिकवा

जिल्हा परिषदेत भाजपला संधी द्या : खा.सुनील मेंढे

प्रतिनिधी: नरेन्द्र मेश्राम लाखनी

सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची प्रतारणा करणाऱ्या राज्यातील आघाडी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. सरकारची जबाबदारी असतानाही ती टाळण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लोकहिताचे कार्य करीत आहे. या योजना अधिक ताकदीने राबविण्यासाठी जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या हाती द्या. भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथे आयोजित सभेत केले.

गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी येथे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन आज करण्यात आले होते.

यावेळी सभेत उपस्थितांना खासदार सुनील मेंढे यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना बोनसचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत, पिक विमा शासनाच्या चुकीमुळे मिळू शकला नाही. कोरोना काळात या आघाडी सरकारमधील सर्व नेते घरात बसून होते. तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गरजूंना मदतीचा हात दिला. मोफत धान्य देण्यापासून ते खात्यावर रोख रक्कम जमा करण्यापर्यंत सर्व मदत केंद्र सरकारने केली. राज्य सरकार केवळ खोटे आश्वासन देत राहिले. मोफत वीज बिल देण्याची घोषणा करणाऱ्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची जोडणी कापून शेतकरी प्रेम दाखवून दिले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, पायाभूत विकासासाठी 15 व्या वित्त आयोगाचा निधी अशा अनेक योजना केंद्र राबवीत आहे. या अधिक खंबीरपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या हाती द्या. भाजपच्या उमेदवाराला विश्वासाने निवडून द्या. ते तुमचा विश्वास सार्थकी ठरवतील तसे आश्वासन यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी दिले.

यावेळी मा.आ.डॉ.परिणयजी फुके, जिल्हाध्यक्ष मा.केशवरावजी मानकर, मा.बाळाभाऊ अंजणकर, मा.गोपालजी अग्रवाल, मा.रमेशजी कूथे, मा.दीपक कदम, मा.संजयजी कुलकर्णी, मा.नेतरामजी कटरे,मा.अशोकजी इंगळे, मा.धनलालजी ठाकरे, मा.सुनीलजी केलंका, मा.सौ.भावनाताई कदम, मा.योगराज रहांगडाले, मा.देवचंदजी नागपुरे, मा.मनोजजी मेंढे, मा.मौसमी सोनछात्रा व सर्व उमेदवार, कार्यकर्ता तसेच नागरिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close