मूल नगरीत होणार राष्ट्रीय लोकहित सेवाच्या वतीने महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देणार कर्तृत्ववान 12 महिलांना पुरस्कार
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
शनिवार दि.9 मार्चला राष्ट्रीय लोकहित सेवाच्या वतीने मूल स्थित दर्पण वाचनालय, पत्रकार भवन येथे सकाळी 11वाजता जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.सामाजिक, कला साहित्यिक, शैक्षणिक आदिं क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तृत्ववान 12 महिलांना या वेळी सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.आयोजित समारंभाचे अध्यक्षस्थान चंद्रपूरच्या सुपरिचित अधिवक्ता पुनम वाघमारे ह्या विभूषित करणार असून विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्रातील नामवंत महिला सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या मायाताई कोसरे व राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर निवासी कर्जमुक्ती अभियानाच्या गिता मेहर चंद्रपूरच्या जेष्ठ साहित्यिक सविता कोट्टी -सातपुते, शंकरपूरच्या सुपरिचित कवयित्री वर्षा शेंडे, सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार, मुलच्या नलिनी आडपवार उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी आज या प्रतिनिधीस चंद्रपूर मुक्कामी दिली . राष्ट्रीय लोकहित सेवाचा हा सन्मान पुरस्कार प्राप्त करणा-यांत प्रामुख्याने रंजू दिलीप मोडक(चंद्रपूर )वैजयंती विकास गहुकर (चंद्रपूर) उज्वला पद्माकर निमगडे (दुर्गापूर चंद्रपूर)श्रीमती पौर्णिमा राजेश कीर्तीवार(चिरोली ,ता.मूल) कु. किरण विजय साळवी(भद्रावती जि.चंद्रपूर )कु प्रियंका पांडुरंग गायकवाड(शेगांव खूर्द तह .भद्रावती जि.चद्रपूर ) कु. स्नेहा उत्तम मडावी (पुना ) पुनम सुभाष मडावी चिखली तह.मूल जि.चद्रपूर ) सरोज विठ्ठलराव हिवरे (राजूरा जि.चद्रपूर )चैताली निलेश आत्राम (शहापूर जि.ठाणे) श्रीमती ज्योती संजय इंगळे ( तळोधी बाळापूर तह .नागभिड जि.चंद्रपूर) कु.रश्मी गजानन पचारे(सोलापूर )यांचा समावेश असल्याचे राष्ट्रीय लोकहित सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ व महिला सामाजिक कार्यकर्त्या अर्चना समर्थ यांनी या प्रतिनिधीस सांगितले.