ताज्या घडामोडी

प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उंच भरारी घ्यावी- डॉ.सतीश वारजूरकर

प्रतिनिधी :हेमंत बोरकर
मो.9403884389

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर व समता महिला प्रभागसंघ खडसंगी-मुरपार याचे द्वारे आज दिनांक 15/6/2022 रोज बुधवार ला ग्रामदर्शन कनिष्ठ महाविद्यालय खडसंगी येथे वार्षिक अधिवेशन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री सतीश वारजूरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपुर म्हणाले की महिलांनी आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उंच भरारी घ्यावी तसेच महिलांनी उद्योजक बनावेत.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री.अजहर शेख माजी पंचायत समिती सदस्य यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की महिला ह्या स्वयंपूर्ण झाल्या पाहीजेत. कार्यक्रमाला श्री.रोशनभाऊ ढोक माजी पंचायत समिती उपसभापती, अध्यक्ष म्हणून सौ. संगीताताई थुटे, प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रशांतभाऊ कोल्हे सरपंच तथा मनसे जिल्हा उपाध्यक्ष, श्री. पुंडलिक चौखे सभापती आ.वि.सो., सरीतताई निखाडे, श्री. राजेश बारसागडे BMM, श्री प्रशांत मडावी BM, सौ.उषा पेंदाम प्रभागसंघ सचिव उपस्थित होते.
कार्यकामाला प्रभागातील 42 गावातील समूह सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रम मध्ये महिलांची कबड्डी स्पर्धा, संगीत खुर्ची, वैयक्तिक डान्स, सामूहिक डान्स, गीत गायन स्पर्धा, चम्मच निंब स्पर्धा , फुगडी स्पर्धा, पोता गेम घेण्यात आला व विजयी स्पर्धकांना शिल्ड देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सौ. काजल पाटिल ICRP, प्रस्ताविक सौ. नागोसे प्रभागसंघ लिपिक व आभार सौ. दुर्गा रोकडे ICRP यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. बोरकर प्रभाग समन्वयक, श्री. गेडाम व्यवस्थापक ,सर्व अभियानातील कॅडर यांनी सहकार्य केलेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close