शिवसेना बाळासाहेबांची जिल्हा प्रमुख श्री नितीन मत्ते यांचे नेतृत्वावर विश्वास ठेऊन युवकांचा पक्ष प्रवेश
चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
शिवसेना जिल्हा प्रमुख श्री नितीन मत्ते यांचे नेत्तृत्वावर विश्वास ठेऊन जिल्ह्यातील सात तालुक्यातील युवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश घेतला,
शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना, एकनाथजी शिंदे यांचे आदेशानुसार जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी किरण पांडव पूर्व विदर्भ सपर्क प्रमुख व बंडू भाऊ हजारे सह संपर्क प्रमुख चंद्रपूर जिल्हा यांचे हस्ते शिवसेना व उप जिल्हा पदाधिकारी जाहीर केले यावेळी ज्यांनी या पक्षप्रवेशात मोलाची भूमिका बजावली नितीन मत्ते यांचे खंदे सर्मथक आशिष ठेंगणे यांनी बजावली या वेळी श्री चेतन घोरपडे उपस्थित होते .
कमलेश शुक्ला उपजिल्हाप्रमुख बल्लारपूर विधानसभा क्षेत्र, नेताजी गहाने तालुका प्रमुख सिंदेवाही, कैलाश कापगाते तालूका प्रमुख सावली भरत बिराधर तालुका प्रमुख जिवती, राकेश राठोड तालूका प्रमुख कोरपणा, संतोष पारखी तालूका प्रमुख चंद्रपूर,संभा पेंदोर उपतालुका प्रमुख जिवती या पदावर सर्वांची नियुक्ती जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी जाहीर करून पक्षवाढी साठी तसेच जनसामान्यांना न्याय देवून समाज हिताचे कार्य करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हात बळकट करण्याच्या सूचना दिल्या वं पक्ष वाढीसंदर्भात सुचना दिल्या . चंदपूर जिल्ह्यातील एक बहुआयामी नेतृत्व म्हणून नितीन मत्ते यांच्याकडे जिल्ह्यातील युवा वर्ग त्यांच्या नेतृवावर विश्वास ठेवताना दिसत आहे . नितीन मत्ते यांचा जनसामान्य नागरिकांत असलेला दांडगा जनसंपर्क व काम करण्याची हातोटी त्यामुळे युवा वर्ग, शेतकरी वर्ग, कामगार, कष्टकरी, समाजातील सर्व घटक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतांना दिसत आहे .लवकरच सपूर्ण जिल्ह्यातिल कार्यकारीनी जाहीर करू असे नितीन मत्ते यांनी सांगितले .