वृक्षरोपण व पर्यावरण संवर्धन काळाची गरज …. ब्रह्मकुमारी मीरा दीदी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 16 जून वार गुरुवार रोजी संत ज्ञानेश्वर महाराज वृद्धाश्रम नरवाडी येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा सोनपेठ च्या वतीने वृद्धाश्रमातील वृद्धांना जीवनावश्यक वस्तू फळ, धान्य व आर्थिक स्वरूपाने मदत करून वृक्षारोपण करण्यात आले . वृक्षारोपण साठी बदाम , कडीपत्ता , कडू निंब, जाबुळ,अशा विविध रोपे लागवड करण्यात आली तसेच पर्यावरण जनजागृती पर मार्गदर्शन ब्रह्मा कुमारी मीरा दीदी यांनी केले सकस आहारा सोबत शुद्ध हवा असणे ही गरजेचे आहे त्यासाठी वृक्ष लागवड करून झाडे जगवली पाहिजेत .प्रत्येक वर्षी फक्त वृक्ष रोपण न करता झाडे लाऊया !! झाडे जगूया !!! असे प्रन प्रत्येकजण करूया तरच येत्या काळात भावी पिढी ला शुद्ध हवा पाणी मिळू शकेल ,संतांनी वेळोवेळी सांगितले आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे….. या प्रमाणे आपणही एक भावनिक नात वक्षाशी नक्की बणुया असे विचार ब्रह्मा कुमारी मीरा दीदी यांनी व्यक्त केले .कार्यक्रम साठी उपस्थित मान्यवर वृद्धांना मदत करणाऱ्या माधवी ताई गुजराथी तसेच , कमलबाई गुजराथी कृष्णा माने, अध्यक्ष संत ज्ञानेश्वर महाराज वृद्धाश्रम नरवाडी तसेच प्रभाकर माने,रवी जोगदंड, सौ. सरस्वती प्रभाकर माने, आश्रमातील सर्व वृद्ध माता पिता यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले .तसेच वृद्ध माता-पित्यांना फळ वाटप करून चहापाणी करण्यात आले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कृष्णा माने ,प्रभाकर माने, व ब्रह्मा कुमारी मीरा दीदी तसेच धनंजय देशमुख यांनी सुचारू रूपाने नियोजन केले.