भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
उपसंपादक: विशाल इन्दोरकर
पुरोगामी महाराष्ट्र कामगार संघटना ट्रेड युनियन नवयुवक क्रीडा मंडळ बारटोला / सावरटोला यांच्या सौजन्याने मौजा बारटोला/सावरटोला (नवेगाव बांध) येथे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा बारटोला च्या भव्य पटांगणावर दि. २१/११/२०२१ रोज रविवारला भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
दि. २१/११/२०२१ रविवार ला दुपारी १२ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन मा. नानाभाऊ पटोले (प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस), सहउद्घाटक मा. राजुभाऊ पारवे ( आमदार उमरेड विधानसभा), अध्यक्ष मा. मनोहरजी चंद्रिकापुरे (आमदार अर्जुनी मोर.), उपाध्यक्ष मा. सुधीर सुर्वे ( पुरोगामी महाराष्ट्र कामगार संघटना ट्रेड युनियन प्रदेश अध्यक्ष) तथा मा. सुनीलभाऊ तरोणे (मराठा सेवा संघ अध्यक्ष गोंदिया) यांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेचे प्रथम बक्षीस ₹ ४० हजार, द्वितीय बक्षीस ₹ २५ हजार, तृतीय बक्षीस ₹ १५ हजार आहे. तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी या स्पर्धेत सहभागी होऊन खेळाचा आनन्द घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.